लाइफस्टाइल

राहुल द्रविडची जाहिरात शेअर करत पोलिसांचे भन्नाट ट्विट

शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून उच्छाद मांडलेल्या कोरोना विषाणूचं संकट अद्यापही टळलेलं नाही. त्यामुळे मुंबई पोलिस सातत्याने नागरिकांमध्ये जनजागृतीचं काम करत आहेत. गरजेशिवाय घराबाहेर पडू नका, सुरक्षेच्या नियमांचं पालन करा असं आवाहनदेखील सतत करत आहे. हे आवाहन करण्यासाठी आतापर्यंत त्यांनी अनेक भन्नाट युक्त्या वापरल्या आहेत. कधी चित्रपटाचे डायलॉग्स, कधी अभिनेते यांचा वापर त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी चक्क क्रिकेटपटू राहुल द्रविड याचा वापर केला आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर राहुल द्रविड आणि मुंबई पोलिस या दोघांची जोरदार चर्चा रंगली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर #Rahul Dravid # Indiranagar ka gunda hun main हे दोन हॅशटॅग चांगलेच व्हायरल झाले आहेत. एका जाहिरातीमध्ये राहुल द्रविड झळकला असून यात त्याचा कधी न पाहिलेला अंदाज पाहायला दिसून आला. मैदानात कायम शांत आणि संयमाने खेळणारा राहूल या जाहिरातीत मात्र प्रचंड आक्रमक असल्याचं दिसून आलं. त्यामुळेच त्याच्या या नव्या अंदाजाचा वापर मुंबई पोलिसांनी जनजागृतीसाठी केला आहे.

'कोरोना विषाणू तुमच्याकडे येतोय, हे मास्क पाहतोय', असं कॅप्शन देत मुंबई पोलिसांनी राहुल द्रविडचा फोटो शेअर केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून मुंबई पोलिसांनी कोरोना विषाणूविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांप्रमाणेच सूरत पोलिसांनीदेखील हा व्हिडीओ शेअर केला आहे.

काय आहे जाहिरात?

व्हायरल होत असलेल्या जाहिरातीमध्ये राहूल द्रविड  एका गाडीमध्ये उभा राहतो आणि हातात बॅट घेऊन  "मैं इंदिरानगर का गुंडा हूँ", असं म्हणतो. त्यानंतर तो चक्क लोकांशी भांडण करताना दिसत आहे. कधी तो लोकांची वाद घालतोय, तर कधी तो बॅटने गाड्यांची तोडफोड करतोय.  विशेष म्हणजे मैदानात कायम संयमाने वागणाऱ्या राहूलचा हा नवा अंदाज पहिल्यांदाच चाहत्यांनी पाहिल्यामुळे ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर चर्चिली जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

आकाश पाळण्यात महिलेचे केसं अडकले, केसांसह चामडी निघाली; तांन्हा पोळ्याच्या यात्रेत थरारक घटना

Kaygaon News : गोदावरीत उडी घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या अल्पवयीन मुलाचे पोलिसांनी वाचवले प्राण

Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

SCROLL FOR NEXT