SIP Investment esakal
लाइफस्टाइल

'SIP' मध्ये गुंतवणूक करताय? मग या गोष्टी लक्षात घ्या; योग्य गुंतवणूक देईल योग्य नफा

जर तुम्हालाही एसआयपी मधून पैसे कमवायचे असतील, तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे

साक्षी राऊत

SIP Investment : आजच्या काळात गुंतवणुकीचे हजारो पर्याय आहेत. यापैकी एक म्हणजे म्युच्युअल फंडाची एसआयपी. जर तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी पैसे गुंतवले, तर तुम्हाला नफा मिळविण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. असेच काहीसे एसआयपी गुंतवणूकदारांच्या बाबतीत घडले आहे. एसआयपीने गेल्या काही वर्षांत गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही एसआयपी मधून पैसे कमवायचे असतील, तर तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. अन्यथा कष्टाने कमावलेला पैसा वाया जाईल. तुम्ही काय काळजी घ्यावी ते आम्ही तुम्हाला सांगतो.

मोठ्या रकमेची गुंतवणूक करू नका

एसआयपीमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही हे लक्षात ठेवावे की तुम्ही मोठी रक्कम गुंतवू नये. मोठी रक्कम गुंतवून भविष्यात पैशांच्या कमतरतेमुळे, तुमची एसआयपी खंडित होते आणि तुम्हाला कमी नफा मिळतो.

अशी बनवा मार्केट स्ट्रॅटेजी

जेव्हा मार्केटमध्ये तेजी असते, त्या वेळी गरज पडल्यास थोडा नफा घ्यावा. त्याचबरोबर शेअर बाजारात मोठी घसरण झाल्यास थोडे अधिक पैसे गुंतवले पाहिजेत. (SIP)

कंपाउंडिंगचा फायदा

एसआयपीमध्ये चक्रवाढ व्याजाचा फायदा प्रचंड आहे. म्हणूनच एसआयपी दीर्घकाळासाठी केली पाहिजे, ती जितकी जास्त असेल तितकाच चक्रवाढ व्याजाचा फायदा होईल.

मध्येच थांबवू नका एसआयपी

शेअर बाजारात चढ-उतारांची प्रक्रिया सुरूच असते, यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. मंदी पाहून अनेक जण गुंतवणूक करणे थांबवतात. असे करू नका. अशावेळी बरेच शेअर्स स्वस्तात मिळतील. अशा परिस्थितीत गुंतवणूक करून, जेव्हा तेजी येते, तेव्हा गुंतवणुकीचा भरपूर फायदा मिळवता येतो. (Investment)

घाईघाईत गुंतवणूक करू नका

जेव्हा लोक बाजारात तेजी पाहतात, तेव्हा ते गुंतवणूक करण्यास सुरुवात करतात. पण गुंतवणुकीच्या दृष्टीने हे चांगले नाही, कारण शेअर बाजार अप्रत्याशित आहे. यामध्ये बाजार वेगाने वाढतो, त्यानंतर दुप्पट वेगाने घसरतो देखील. त्यामुळे अशी गुंतवणूक टाळा.

(टिप- वरील माहितीचा उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT