Happy Life Sakal
लाइफस्टाइल

Happy Life: होय मी आनंदी आहे...

मी सकारात्मक विचारांची असल्यामुळे कडू अनुभवांना फाटा देऊन सुखद आठवणींना उजाळा देते त्यात मन रमवते. म्हणूनच माझा वार्धक्याचा वेळ उत्तम जातो.

पुजा बोनकिले

सुनंदा डबीर

माझ आयुष्य कडू गोड आठवणींनी समृद्ध आहे. मी सकारात्मक विचारांची असल्यामुळे कडू अनुभवांना फाटा देऊन सुखद आठवणींना उजाळा देते  त्यात मन रमवते. म्हणूनच माझा वार्धक्याचा वेळ उत्तम जातो.  लहानपणापासून बोलकी, बडबडी थोडीशी खोडकर होते. हसर्या आनंदी विनोदी स्वभावामुळे पटकन मैत्री व्हायची व ती टिकण्यासाठी जिवाचं रान करायची.

लोकसंग्रह भरपूर होता. मैत्रिणीच्या आई माझी आई बनून लाड करायच्या. अगदी गरीब श्रीमंत सगळ्यांच्या गुडबुक मध्ये मी होते. शाळा, कॉलेजमधील शिक्षकांची लाडकी होती. वक्तृत्वाची, स्पर्धेची ची तयारी करून घेणे, मानसिक आधार देणे, कौतुकाची थाप पाठीवर देणे, अभ्यासात विनामूल्य शिकवणे ही मदत मला वेळोवेळी मिळाली.

खोड्यांमुळे आईचा मार पण खाल्ला. मला आठवते आमची एकत्र गच्ची होती शेजारी सारे ओळींनी झोपायचे. मला माझ्या मैत्रिणीला सरप्राइज द्यायचे होते. म्हणून मी मेंदी भिजऊन वाटी उशाशी ठेवली. मला मात्र झोप लागली. रात्री उशिरा झोपायला आली. मध्यरात्री मला जाग आली तेव्हा तिचे कुटुंब डोक्यावर पांघरून झोपले होते. मी हळूच हात बाहेर काढला हाताला मेंदी लावली.

सकाळी उठून तिचा हात पहिला तर तिचा हात साधाच. मी विचारले, मी रात्री तुला मेंदी लावली. ती म्हणे ध्यास घेऊन झोपलीस की स्वप्न पडल तुला. मी बघितले तर वाटीत मेंदी पण नव्हती. मग कोणाला लावली? उशिरा संजुचे वडील उठले पाहतात तर काय त्यांचं हात लालबुंद.

संजूने त्यांना समजावले. '' मी समजून रात्री तिने चुकून मेंदी लावली. मग त्यांनी मला विचारले,'' आयुष्यात कधी मेंदी लावली नाही आता ऑफिसला कसा जाऊ ? मी माफी मागितली. बिचारे काका ऑफिसमध्ये प्रत्येकाने त्यांना विचारल. '' साब मेंदी किसने लगाई !''. तर ते म्हणे, ''बेटीने''. एकदा एक शेजारी माझ्या वडिलांशी भांडले होते. मी माझ्या छोट्या भावंडाना बरोबर घेऊन चक्क '' दारू की बोतल मे साहब पानी भरता है फिरना कहन मायकल दारू पिके दंगा करता है'' या गाण्यावर त्यांना भंडावून सोडल होत. त्यांनी आईला बोलून माझी तक्रार केली. पुन्हा मला परत धपाटे पडले. अशा गमती जमती आठवल्या की मन प्रसन्न होत. अजूनही असे किस्से निघिले की माझी भावंडे आठवण करून हसतात. मलाही वाटते, मी कधी मोठी होणारच नाही. सदा  आनंदी राहणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचं मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT