Nag Panchami 2023 esakal
लाइफस्टाइल

Nag Panchami 2023 : नागपंचमीला का करतात नागाची पूजा? काय आहे कारण, जाणून घ्या

यंदाच्या नागपंचमी शुभ मुहूर्त कोणते आहे?

Pooja Karande-Kadam

Nag Panchami 2023 : हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्य श्रावण महिन्याला आजपासून सुरूवात होत आहे. श्रावण महिन्यातल्या पहिल्याच सोमवारी नागपंचमी आहे. हा एक दुर्मिळ योगायोगच समजला जात आहे.

श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी नागपंचमी उत्सव साजरा केला जातो. या दिवशी नागांची पूजा केली जाते. म्हणूनच या पंचमीला नागपंचमी म्हणतात. ज्योतिषशास्त्रानुसार पंचमी तिथीचा स्वामी नाग असल्याचे मानले जाते. या दिवशी नागांची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. (Shravan 2023)

नाग देवता भगवान शंकराच्या गळ्याभोवती विराजमान आहे. जे त्यांचा एक दागिना मानला जातो. नाग कुठेही भटताना दिसला की लोक घाबरतात. त्याच्या जीवावर उठतात. असं असताना नागदेवांची पूजा का बरं केली जाते.(Nag Panchami 2023 : Reason snakes are worshiped in Nagpanchami)

आधुनिक काळात यामागे काही खास कारणे आहेत, पण ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. ज्यामुळे त्याची पौराणिक कथाही आहे. जाणून घ्या काय आहे त्याचे खास कारण आणि पौराणिक कथा.

भारत हा कृषीप्रधान देश मानला जातो. दुसरीकडे साप आपल्या शेताचे रक्षण करतात कारण ते पिकांचे नुकसान करणारे उंदीर आणि कीटक खातात, म्हणून त्यांना क्षेत्रपाल असेही म्हणतात आणि म्हणूनच लोक त्यांची पूजा करतात.

याचं दुसरं कारण म्हणजे सापांना सुगंध खूप आवडतो. याच कारणामुळे आपल्या पुराणात सापांना खूप उच्च स्थान देण्यात आले आहे, त्यामुळे लोक त्यांची पूजा करतात.

श्रावणातील पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. सापाला शेतकऱ्याचा मित्र मानले जाते. याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे.

नागपंचमी साजरी करण्यामागील पौराणिक कथा काय आहे

एकदा एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला. त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेरून आलेल्या नागिणीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला. त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायकोमुलांसह दंश करून मारले. त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती.

शेवटी तिलादेखील दंश करून मारण्यासाठी नागीण तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती. मनोभावे पूजा करून तिने दूधलाह्यांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखविला. तिची ती भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला. ती स्वतः ते दूध प्यायली. तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले.

यंदाच्या नागपंचमी शुभ मुहूर्त कोणते आहे?

पंचमी तिथी सकाळी 5.53 से 8.29 पर्यंत पूजेसाठी शुभ मुहूर्त आहे. नागदेवता आणि शंकर भगवानची पूजा आणि अभिषेक करावा. त्यानंतर दूध आणि मखाना यांचा नवैद्य अर्पण करावे. या दिवशी शिवलिंग आणि नागदेवतेला दुध अर्पण करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT