national champion boxer abid khan  File photo
लाइफस्टाइल

नशिबाची थट्टा! नॅशनल लेव्हलच्या बॉक्सरवर आली रिक्षा चालवायची वेळ

त्यांनी पाच वर्ष सैन्यात प्रशिक्षक पदावरही काम केलं आहे.

शर्वरी जोशी

वाईट वेळ आणि परिस्थिती कधी कोणत्या क्षणी ओढावेल याचा काही नेम नसतो. सध्याच्या काळात ही परिस्थिती अनेकांवर आल्याचं दिसून येत आहे. कोरोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जणांचे उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. परिणामी, अनेकांवर उपासमार व बेरोजगारीची वेळ आली आहे. यात राष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या एका बॉक्सरवरदेखील वाईट वेळ आली आहे. एकेकाळी राष्ट्राचं नाव उज्ज्वल करणाऱ्या या बॉक्सरवर चक्क रिक्षा चालवण्याची वेळ आली आहे.

पंजाबमधील आबिद खान या बॉक्सरची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. युट्यूबवर आबिद खान यांचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये त्याच्यावर ओढावलेल्या परिस्थितीचं कथन करण्यात आलं आहे.

हेही वाचा : ३० एप्रिलपर्यंत देशात कडक लॉकडाउन?

आबिद खान नॅशनल लेव्हलचे बॉक्सर असून त्यांनी पाच वर्ष सैन्यात प्रशिक्षक पदावरही काम केलं आहे. मात्र, सध्या त्यांच्यावर रिक्षा चालवण्याची व बाजारात हमाली करण्याची वेळ आली आहे.

पंजाब विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले आबिद खान सध्या पंजाबमध्येच रिक्षा चालवत आहे. घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे या आर्थिक तंगीतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, आता ते रिक्षा चालवून कुटुंबाचा उदनिर्वाह करत आहेत. बॉक्सिंगची आवड असूनदेखील कर्तव्यापोटी त्यांना त्यांच्या स्वप्नांना मुरड घालावी लागली आहे. विशेष म्हणजे देशासाठी योगदान देणाऱ्या आबिद यांना त्यांच्या संकट काळात शासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलांनादेखील स्पोर्ट्स जॉइन करण्यास सक्त मनाई केली आहे.

आबिद खान यांना दोन मुलं असून त्यांनी मुलांना स्पोर्ट्स जॉइन करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. तसंच सध्या त्यांना पुन्हा बॉक्सिंगचे कोचिंग क्लासेस सुरु करण्याची इच्छा आहे. मात्र, पैशाअभावी त्यांचं हे स्वप्न अपूर्ण राहिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT