National Best Friend Day 2024 : esakal
लाइफस्टाइल

National Best Friend Day 2024 : तेरी मेरी यारी; अबोला धरलेल्या मित्राची अशी काढा समजूत, मैत्री चिरंतन टिकेल

Friendship Day ऑगस्टमध्ये असला तरी आज National Best Friend Day साजरा केला जातो

सकाळ डिजिटल टीम

National Best Friend Day 2024 :

जीवनात रक्ताच्या नात्यांसोबतच मैत्रीचे नाते सर्वात महत्त्वाचे असते. या नात्यात जे प्रेम, काळजी आणि आधार आहे ते इतर कोणत्याही नात्यात मिळत नाही. म्हणून आपण आपला चांगला मित्र कधीही गमावू नये. कारण, या जगात जीवाला जीव देणारा, संकटात धावून येणारा मित्र क्वचितच मिळतो.

म्हणतात ना मैत्री तोडणं सोप्प आहे, पण ती टिकवणं खूप अवघड. अनेक संकटांतून बाहेर पडूनही जो साथ सोडत नाही तो सच्चा मित्र. पण, तरीही काही लोकांची मैत्री शुल्लक कारणांवरून तुटते. अनेक वर्ष सुरू असलेली मैत्री एका छोट्या चुकीमुळे लोक तोडतात.  

जर तुमचा चांगला मित्रही तुमच्यावर रागावला असेल, तर आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमची मैत्री पूर्वीपेक्षा अधिक चांगली आणि दृढ बनवू शकता. आज National Best Friend Day आहे. त्यामुळेच आज आपण मित्राशी झालेलं भांडण कसे मिटवायचे हे पाहुयात.  

बोलणं कधीच बंद करू नका

तुमच्या भांडणाचे कारण काहीही असो आपल्या मित्राशी बोलणं सुरू ठेवा. चूक तुमची असेल तर माफी मागा आणि जसे दररोज मित्रांना भेटत होता, तसे भेटा बोला. कारण, संवाद संपले की वाद सुरू होतात. त्यामुळे कोणतंही भांडणं मिटवायचे असेल तर ज्याच्याशी भांडलो आहोत त्यांच्यांशी संवाद सुरू ठेवा.  

मित्रासोबत बाहेर जा

वाद मिटायचा नाव घेत नसेल तर तुमच्या मित्राला काय आवडतं ते आठवा. आणि त्याला ती वस्तू, त्या ठिकाणी घेऊन जा. ज्यामुळे मित्राला तुमच्या मैत्रीची जाणिव होईल आणि तो पुन्हा पहिल्यासारखे बोलू लागेल.

चूक मान्य करा

वाद-भांडणं मिटवण्याचा हा सोप्पा आणि जालीम उपाय आहे. मित्रासमोर जा आणि त्याची माफी मागा. तरीही तुमचा मित्र ऐकायला तयार नसेल, तर सरळ त्याला लोटांगण घाला. त्यामुळे तुम्ही छोटे होणार नाही. तर उलट या मैत्रिची तुम्हा दोघांना किती गरज आहे, याची जाणिव तुमच्या मित्राला होईल.

मित्राला वेळ द्या

तुम्ही तुमच्या जिवलग मित्राला विचार करायला वेळ द्या. काही लोक भांडणानंतर शांत होण्यासाठी वेळ घेतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या मित्राला वेळ द्यावा. ज्यामुळे मित्राचा राग शांत होईल आणि तो स्वत:हून तुमच्याशी बोलायला येईल.

विषय क्लिअर करा

तुमच्या दोघांमधील वाद ज्या मुद्द्यावरून झाला आहे त्याबद्दल तुम्ही थेट बोलले पाहिजे. जर तुम्ही एकमेकांना चांगले समजून घेतले तर तुमची मैत्री नक्कीच टिकू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

राजकुमार रावचं झालं प्रमोशन! अभिनेता होणार बाबा; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली गुडन्यूज

SCROLL FOR NEXT