Navratri 2024 Sakal
लाइफस्टाइल

Navratri 2024: नवरात्रीत 9 दिवस उपवास करणाऱ्यांना मिळतात ढिगभर फायदे, वाचाल तर तुम्हीही कराल उपवास

Navratri 2024: उपवासा दरम्यान सात्विक आहार आणि फळांचे सेवन केले जाते. यामुळे आरोग्यासंबंधित अनेक आजार दूर राहातात.

पुजा बोनकिले

Navratri 2024: हिंदू धर्मात नवरात्रीला खुप महत्व आहे. यंदा 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीचा सण सुरू झाला आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

देशभरात शारदीय नवरात्र आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते. अनेक ठिकाणी माता दुर्गा बसवली जाते. देवीसमोर गरबा आणि दांडिया खेळला जातो. देवीचे अनेक भक्त नवरात्रीत नऊ दिवस उपवास करतात. उपवासा दरम्यान सात्विक आहार आणि फळांचे सेवन केले जाते. यामुळे आरोग्यासंबंधित अनेक आजार दूर राहातात. तसेच आणखी कोणते आरोग्यदायी फायदे होतात हे जाणून घेऊया.

शरीर डिटॉक्स होते

एनसीबीआयच्या अहवालानुसार उपवास केल्याने शरीर डिटॉक्स होते. जे लोक सतत तेलकट किंवा जंक फूडचे सेवन करतात त्यांच्या पोटाच गॅसचे प्रमाण वाढते. नवरात्रीचे ९ दिवस उपवास केल्याने संपुर्ण शरीर डिटॉक्स होते. कारण नऊ दिवस तेलकट आणि जंकफूड खाणे बंद होते. उपवासा दरम्यान सात्विक पदार्थांचे सेवन केले जाते. यामुळे त्वचा आणि पोटाचे आरोग्य निरोगी राहते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

अनेक वेळा वातावरणातील बदलामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे सर्दी, खोकला यासारखे आजार उद्भवतात. पण तुम्ही उपवास करत असाल तर रोगप्रतिकारशक्ती मजबुत होते तसेच अनेक आजारांपासून दूर राहू शकता. जर तुमचा आहार आधीपासून चांगला असेल आणि व्यायाम करत असाल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबुत राहते.

पचन सुलभ होते

नवरात्रीत उपवास करणाऱ्या लोकांना पचना संबंधित समस्या नसतात. या दिवसात पचन होणे सुलभ होते. कारण या दिवसांमध्ये सात्विक पदार्थ, फळ तसेच कमी कॅलरी असलेले पदार्थांचे सेवन केले जाते.

वजन कमी होते

नवरात्रीचा उपवास केल्यास वजन नियंत्रणात राहू शकते. कारण उपवासात फळ आणि कमी कॅलरीचे पदार्थांचे सेवन केले जाते. उपवासा दरम्यान शरीरात स्टोर फॅट एनर्जी मिळते.

चांगली झोप येते

नवरात्रीत उपवासा दरम्यान फक्त शारिरीक नाही तर मानसिक आरोग्य देखील चांगले राहते. या दिवसांमध्ये सात्विक आहार घेतला जातो. यामुळे शरीरात आणि मनात सकारात्मकता राहते. यामुळे शांत आणि पुरेशी झोप येते. तसेच उपवासा दरम्यान ७ ते ८ तास झोप घेणे गरजेचे असते.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Latest Maharashtra News Updates : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन मनसैनिक मराठी भाषा जल्लोष उत्सव कार्यक्रमाला रवाना

Marathi Bhasah Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Gold Rate Today: सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा उसळी! महाराष्ट्रात 24 कॅरेट सोने 1 लाखाच्या पुढे, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

Shubhanshu Shukla : शुभांशु शुक्लांचा विद्यार्थ्यांशी अंतराळातून थेट संवाद, दिली 'ही' आश्चर्यकारक माहिती..

SCROLL FOR NEXT