Navratri Special Hairstyles esakal
लाइफस्टाइल

Navratri Special Hairstyles : नवरात्रीला स्पेशल लूक करायचा आहे? मग ‘या’ हेअरस्टाईल्सची घ्या मदत

शारदीय नवरात्रौत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Navratri 2023 : सध्या सर्वत्र शारदीय नवरात्रौत्सवाची धामधूम पहायला मिळतेयं. बाजारात देवीच्या पूजेचे सामान, घटाचे सामान, दांडिया, घागरा-चोली, चनिया-चोली इत्यादी अनेक वस्तू खरेदीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. विविध प्रकारचे आऊटफिट्स आणि विविध प्रकारच्या पारंपारिक कपड्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत.

शारदीय नवरात्रौत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या ९ दिवसांमध्ये महिला वर्गाची विविध गोष्टी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू असते. या नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये लूक कसा करायचा? हेअरस्टाईल कशी करायची ? असा प्रश्न अनेक महिलांना पडतो.

आज आम्ही तुम्हाला अशाच काही स्पेशल हेअरस्टाईल्सबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करू शकता.

मेसी बन हेअरस्टाईल

ही हेअरस्टाईल तशी फार कॉमन आहे. वेस्टर्न आणि पारंपारिक अशा दोन्ही लूक्सवर ही हेअरस्टाईल परफेक्ट उठून दिसते. मात्र, खास करून पारंपारिक आऊटफिट जसे की, साडी किंवा लेहेंग्यावर ही हेअरस्टाईल अधिक शोभून दिसते.

ही हेअरस्टाईल करण्यासाठी तुमचे सर्व केस एकत्र करा, त्याला सुंदर मेसी बनचा टच द्या. आता त्यामध्ये सुंदर फुले, गजरा किंवा इतर अ‍ॅक्सेसरीजचा वापर तुम्ही करू शकता.

ट्विस्टेड पोनीटेल हेअरस्टाईल

पोनीटेल हा प्रकार महिलांसाठी नवीन नाही. मात्र, यातीलच एक पुढचा प्रकार म्हणजे ट्विस्टेड पोनीटेल होयं. ही हेअरस्टाईल विशेष करून तरूणींमध्ये प्रसिद्ध आहे. लेहेंगा, चनिया चोली किंवा साडी अशा सर्व प्रकारच्या पारंपारिक आऊटफिट्सवर ही हेअरस्टाईल उठून दिसते. स्मार्ट, सिंपल आणि एलिगंट लूकसाठी ही हेअरस्टाईल एकदम परफेक्ट आहे.

ही हेअरस्टाईल २ प्रकारे करता येते. पहिल्या प्रकारात तुमचे केस दोन भागांमध्ये डिव्हाईड करून त्यांची सुंदर ट्विस्टेड वेणी घाला. दुसऱ्या प्रकारामध्ये साध्या पद्धतीने ट्विस्टेड पोनीटेल करा. त्यामध्ये, तुम्ही विविध प्रकारच्या रिबन्स आणि अ‍ॅक्सेसरीजचा वापर करा.

रेट्रो हेअरस्टाईल

सण-समारंभांमध्ये थोडा रेट्रो फिल देण्यासाठी ही हेअरस्टाईल परफेक्ट आहे. साड्यांवर ही हेअरस्टाईल खास करून शोभून दिसते. दांडिया नाईट्समध्ये जर तुम्ही काही विंटेज आणि स्टायलिश आऊटफीट ट्राय करणार असाल तर त्यावर ही हेअरस्टाईल अधिक शोभून दिसेल.

या हेअरस्टाईलमध्ये तुम्ही केसांमध्ये तिरक्या बाजूला भांग पाडून घ्या. त्यानंतर पुढील केसांना क्लिप्सच्या सहाय्याने बांधून घ्या, त्यानंतर राहिलेल्या केसांचा मस्त अंबाडा घाला. आता तुमचा रेट्रो लूक तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT