Navratri 2023  esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : प्रियजनांना नवरात्रीच्या अशा शुभेच्छा द्या, दुर्गामातेचा आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा!                          

नवरात्रीच्या शुभेच्छांचे हे संदेश आत्ताच फॉरवर्ड करा

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. पुराणातील कथा अन् देशभरात स्थापित असलेले मंदिरे यांमुळे देवी शक्तीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नवरात्रीच्या काळात देवीचे भक्त तिला प्रसन्न करण्यासाठी नऊ दिवस उपवास करतात.

शारदीय नवरात्रीचा उत्सव 15 ऑक्टोबरपासून सुरू होईल आणि 24 ऑक्टोबरला दसऱ्याला संपेल. आज शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची, तर आजच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघटेची पूजा केली जाते.

चंद्रघटा मातेची आराधना केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात. ब्रह्मचारिणी मातेची उपासना विद्यार्थ्यांसाठी अत्यंत फलदायी मानली जाते. जर तुम्हाला माता चंद्रघटा मातेचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळींना पाठवायचा असेल तर त्यांना हे नवरात्रीच्या शुभेच्छा संदेश आत्ताच फॉरवर्ड करा.

गवराई गेली अन् नवरात्री आली

सोन्याच्या पावलाने बघा,

दुर्गा माता सिंहासनारूढ झाली

नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !

या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।
नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

नवरात्रीला होणार अंबेचा जागर

दुर्गेला वहा पाण्याची भरली घागर

देवीच्या आशीर्वादाने होणार संकटं दूर

असं फुलासारखंच तुमचं जीवन येईल बहरून

नवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा !

नवरात्रीला रंगतो रास-दांडियाचा खेळ

सख्या-सवंगड्यांचा बसणार मेळ

नवरात्रीत होणार अंबेचा जागर

तुम्हाला मिळो सुखाचा सागर

शारदीय नवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा !

नवरात्रीत होते घटस्थापना, देवी येते घरोघरी

स्वागताला गं दुर्गेच्या सयांनो घाला सडा रांगोळी

देवी भरेल सौभाग्याची ओटी

सोडू नका कधी तिची कास

तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

Mumbai Railway Station: स्थानकांवरील कामे तत्काळ पूर्ण करा, शिंदेसेना खासदारांचा रेल्वेला आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT