Navratri 2023 esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : कोल्हापुरात बालिकेच्या हस्ते आज कोहळा का फोडला जातो?

कुमारिकेकडून कोहाळा फोडण्याचा विधी प्रतिवर्षी पार पडतो

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : देशभरात नवरात्रीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. देशातील देवीच्या सर्वच मंदिरात विशेष पूजा बांधली जाते. करवीर निवासीनी  श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रीसाठी भक्तांची जत्रा भरली आहे. देवीची रोज वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते. आज पाचव्या माळेला देवीच्या पूजेला विषेश महत्व आहे.

कारण पाचव्या माळेला आई अंबाबाई टेंबलाईटेकडीवर असलेल्या त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. त्यामुळे आज देवीची गजारूढ पूजा बांधण्यात येते. तसेच, आज देवी पालखीतून टेंबलाईदेवीच्या भेटीलाही जाते. त्र्यंबोली मातेची आणि अंबामातेची भेट झाल्यानंतर या मंदिरात कोहळा फोडण्याची प्रथा आहे. कोहळा का फोडला जातो, त्यामागील परंपरा,कथा काय आहे हे पाहुयात.

प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासूर हा येथे राज्य करीत होता. तो महाभयकर राक्षस होता. त्याने राज्यात अनाचार करून देवांना त्रास दिला. म्हणून देवांनी देवीचा धावा केला. देवांच्या विनंतीवरून श्री महालक्ष्मीने राक्षसाच्या वधाची तयारी केली. श्रीमहालक्ष्मीने रजोगुणी देवता.

यंदाच्या वर्षी अशी घडली त्र्यंबोली देवी अन् आई अंबाबाईची भेट

देवीने केदारनाथ व त्र्यंबोलीचे सहाय्य घेतले. श्रीमहालक्ष्मी व कोल्हासुराचे तुंबळ घनघोर युद्ध झाले. श्री महालक्ष्मीने ब्रह्मास्त्राने राक्षसाचे मस्तक उडवून दिले. जयंती ओढ्याजवळ त्याचे धड पडले आणि त्याच्या मुखातून दिव्य सूर्याच्या तेजाप्रमाणे तेज निघून श्रीमहालक्ष्मीचे मुखात शिरले. तसेच राक्षसाच्या शरीराचा कोहळा झाला.

आश्विन पुराणातून पंचमीस हा कोल्हासूर वधाचा प्रसंग झाला. शेवटी कोल्हासूर श्रीमहालक्ष्मीस शरण आला व त्याने तिच्याकडे वर मागितला. आपली कोल्हापूर, करवीर ही नावे चालू आहेत ती तशीच चालू रहावीत, बदलू नयेत. त्याप्रमाणे दोन्ही नावे चालू आहेत. हे युद्ध नऊ दिवस चालले होते. सर्व देवतांनी व ऋषींनी देवीची स्तुती केली व सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला.

या आनंदोत्सव सोहळ्यानिमित्त रत्नखचित सुवर्णाचा मुक्तिमंडप तयार करून घेतला. हा मुक्तिमंडप श्रीयंत्राकृतिप्रमाणे विश्वकर्माने तयार केला. त्याला सुवर्णाचे हजारो कतीर्थ, खांब होते. छताला चमचमणाऱ्या मोत्याच्या झालरी होत्या. तो भव्यदिव्य मंडप वस्त्रांनी सुशोभित आले. केला होता. त्यावर श्रीमहालक्ष्मीचे दिव्य सिंहासन होते. महाकाली, महासरस्वती, श्रीनाथ, गितली. काळभैरव) व इतर देवतांची त्यात सुंदर रत्नांनी सजवलेली अनेक पीठे होती. (Navratri 2023)

एका बाजूस कात्यायनी देवता वस्त्रालंकार लेऊन आपआपल्या स्थानी विराजमान झाल्या होत्या. दुसऱ्या बाजूस सर्व भैरवगण बसले होते. सर्व देवता पूर्वरूप होऊन एकमेकींना भेटल्या. त्यात सिंहासनाधिष्ठ श्रीमहालक्ष्मी दिव्य अशा सौदामिनीप्रमाणे उठून दिसत होती. मंगलवाद्यांचा नाद घुमत होता. आकाशातून पुष्पवृष्टी होत होती. इंद्रांनी व इतर गणांनी सारे गगनमंडळ जयजयकारानी गर्जून सोडले होते.

श्रीमहालक्ष्मीची षोडषोपचारे पूजा केली. नंतर त्यावेळी लक्षात आले की श्रीत्र्यंबोली देवीस राज्याभिषेकाचे आमंत्रण दिलेले नाही. श्रीमहालक्ष्मी तात्काळ उठली. श्रीभैरव व इतर देवतांसह त्र्यंबोलीस पूर्वेकडील टेकडीवर भेटण्यास गेली. पण ती तर पूर्वेकडे तोंड करून, रुसून बसली होती. तिची श्रीमहालक्ष्मीने क्षमा मागितली. तिला परत येणेसाठी विनवणी केली.  

या दोन बहिणींच्या भेटीचा सोहळा प्रत्येक कोल्हापुरकर दरवर्षी अनुभवतो

परंतु त्र्यंबोली देवी म्हणाली की, 'तू करवीरक्षेत्री परत जा. माझा राग गेला आहे. परंतु मी येणार नाही,' श्रीमहालक्ष्मीचा नाईलाज झाला. तिने त्र्यंबोलीची शोडषोपचारे पूजा करविली व अभिषेक करून तिला संतुष्ट केले. तेव्हा त्र्यंबोली देवी म्हणाली, "कोलासुर वधाचा जो प्रसंग आहे, तो इथे मला करून दाखव." त्याप्रमाणे अश्विन शुद्ध पंचमीस श्रीमहालक्ष्मी पालखीतून कोलासुर वधाचा प्रसंग कोहाळा रूपाने राक्षसाचा वध कसा केला ते दाखविते.

ही प्रथा तेव्हापासून चालू आहे. कुमारिकेकडून कोहाळा फोडण्याचा विधी प्रतिवर्षी पार पडतो. अशाप्रकारे महालक्ष्मीने करवीर व कोलासुराचा वध करून सर्व देवांचे राज्य त्यांना परत दिले व या क्षेत्राला करवीर, कोल्हापूर ही नावे तशीच ठेवली. ही कथा "लक्ष्मी-विजय" या ग्रंथात सविस्तर वर्णनासह दिली आहे.

संबंधित माहिती वा.रा.धर्माधिकारी यांच्या ‘श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी’ या पूस्तकातून घेण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT