Navratri 2023  esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : सातवी माळ; भूत,पिशाश्चाचा सर्वनाश करणारी माता काळरात्री, देवीला हाच नैवेद्य द्या

काळरात्री मातेला कोणता रंग आवडतो?

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : नवरात्रीच्या सातव्या माळेला माता कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे. माता दुर्गेची सातवी शक्ती कालरात्री म्हणून ओळखली जाते. दुर्गापूजेच्या सातव्या दिवशी माता कालरात्रीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी साधकाचे मन 'सहस्रार' चक्रात वसलेले असते. यासाठी विश्वातील सर्व सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात.

काली, महाकाली, भद्रकाली, भैरवी, मृत्यु-रुद्राणी, चामुंडा, चंडी आणि दुर्गा अशी देवीची नावे आहेत. तर, कालरात्री ही देवी मातेच्या अनेक विनाशकारी रूपांपैकी एक मानली जाते. रौद्री, धुम्रवर्ण ही माता कालरात्रीची इतर कमी प्रसिद्ध नावे आहेत.

कालरात्रीची पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते, शत्रूंचा नाश होतो आणि शक्ती वाढते,अशी मान्यता आहे. तसेच, देवीच्या या रूपात सर्व राक्षस, भूत, पिशाच्च आणि नकारात्मक शक्ती नष्ट होतात, जे तिच्या आगमनाने पळून जातात.

मातेची कथा

पौराणिक कथेनुसार, एकेकाळी शुंभ, निशुंब,रक्तबी यांसारख्या दुष्ट राक्षसांनी भूतलावर उच्छाद केला होता. लोकांसह देवांनाही त्रास दिला होता. बघेल त्याला उचलणे, मारणे हा त्यांचा नित्यक्रम बनला होता. त्यामुळे वैतागलेले देव गण भगवान शंकरांचा धावा करू लागले.

जेव्हा भगवान शंकरांकडे देव गेले, तेव्हा महादेवांनी माता पार्वतीला या राक्षसांचा विनाश करा असे सांगितले. देवीने महिषासुर रूप धारण करून राक्षसाचा वध केला. पण त्या राक्षसाच्या धडातून अनेक राक्षसांची उत्पत्ती झाली. तेव्हा त्यांचा विनाश करण्यासाठी माता काळरात्रीची निर्मिती पार्वती मातेने केली.

या रक्तबिजातून निर्मित झालेल्या राक्षसांचे मुख धडावेगळे करून त्यातून येणारे रक्त कालीमातेने प्राशन केले. त्यामुळे राक्षसांची निर्मिती थांबली आणि देवीने सर्वच राक्षसांचा वध केला. (Navratri 2023)

मातेची पूजा कशी करावी

सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घाला. मातेच्या मूर्ती, प्रतिमेला गंगाजलाने किंवा शुद्ध पाण्याने स्नान घाला. देवीला लाल रंगाचे कपडे अर्पण करावेत. देवीला फुले अर्पण करून तिथे दिवा लावावा. शेवटी देवीच्या मंत्राचा जाप करून देवीची आरती करावी.

देवीचा मंत्र- ‘ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चै ऊं कालरात्रि दैव्ये नम:।’

माता कालरात्रीला कोणता नैवेद्य दाखवावा

तसे तर भक्तांनी अर्पण केलेलं सर्वच देवीला प्रिय असतं. पण पार्वती मातेच्या या रूपाला गूळ सर्वाधिक प्रिय आहे. त्यामुळे देवी कालरात्रीला गूळाचा नैवेद्य दाखवावा.

मातेला कोणता रंग आवडतो

दुर्गेचे हे रूप थेट मैदानात उतरून राक्षसांचा विनाश करणारे आहे. त्यामुळे देवीच्या या रूपाला रक्तासारखा लाल भडक रंग जास्त आवडतो. त्यामुळे देवीची पूजा करताना लाल कपडे परिधान करा. तसेच देवीला लाल रंगाची फुले अर्पण करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : पानशेत धरण कालव्यात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू; हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमची तत्काळ मदत

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT