Navratri 2023  esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023  : नवरात्रीत चुकूनही दुर्गामातेला ही फुले वाहू नका, होऊ शकते मोठे नुकसान

नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीला नऊ फुलांच्या माळा अर्पण करण्याची परंपरा आहे

Pooja Karande-Kadam

Navratri 2023  : शारदीय नवरात्रीचा उत्सव काही दिवसांत सुरू होत आहे. नवरात्रीमध्ये देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देवीचे प्रतिक असलेले घट स्थापन करून त्यात वेगवेगळ्या प्रकारची धान्ये पेरली जातात. नऊ दिवस त्यांची पूजा करून त्यांना पाणी घातलं जातं. हे बीज नऊ दिवसात बहरून येतात.

या घटाची नऊ दिवस विधीपूर्वक पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहते अशी मान्यता आहे. त्याचबरोबर नवरात्रीच्या काळात पूजेच्या पद्धतीला खूप महत्त्व आहे. या घटावरती रोज एका फुलाची माळ घातली जाते. अशा नऊ माळा देवावर वाहिल्या जातात.

यात कधी झेंडू, कधी खाऊच्या पानांची तर कधी निशिगंधांच्या पांढऱ्या कळ्यांची माळ देवीला वाहिली जाते. तुम्हाला माहितीय का की अशी दोन फुलं आहेत जी देवीला वाहिली जात नाहीत.

अशी अनेक फुले आहेत जी नवरात्रीत अर्पण करू नयेत. असे केल्याने देवी माता क्रोधित होते आणि अशुभ परिणाम देखील होऊ शकतात. ज्योतिषी पंडित नंदकिशोर मुद्गल यांनी सांगितले की, दुर्गादेवीच्या चरणी फुले अर्पण केल्याने सुख-समृद्धी वाढते.

याने पापांचा नाश होऊन शुभफल प्राप्त होते. तसेच नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीच्या विविध रूपांना वेगवेगळी फुले अर्पण करण्याची परंपरा आहे. परंतु अशी अनेक फुले आहेत ज्यामुळे देवी दुर्गा रागावू शकते आणि नकारात्मक शक्ती वाढू शकते.

दुर्गामातेला अनेक फुले आवडतात. देवीला लाल जास्वंदांचे खूप आवडते. जास्वंदाचेही अनेक प्रकार आपल्याला पहायला मिळतात. त्यातील कोणतेही फूल तुम्ही देवीला वाहू शकता. (Navratri 2023)

देवीला लाल जास्वंदांचे खूप आवडते

तर, अशी अनेक फुले आहेत जी दुर्गादेवीला अर्पण केली जाऊ शकत नाहीत. त्यात चाफा आणि धोतरा ही फुले आहेत. माता दुर्गेला तगर आणि रूईची फुले कधी वाहू नयेत.

चाफा सुगंधी असला तरी तो देवीला अप्रिय आहे

दुर्गादेवीला सुकलेली फुलेही अर्पण करू नयेत. तर महत्वाची गोष्ट म्हणजे दुर्गा देवीला दुर्वा अर्पण करू नयेत. दूर्वा देवीला आवडत नाहीत. त्यामुळे या कधीच वाहू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT