Navratri 2023  esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : नवरात्रीच्या नऊ दिवसात चुकुनही करू नका या चूका, देवीच्या क्रोधाचा होईल संसारावर परिणाम

हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र मानले जातात

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : गणेशोत्सवानंतर आता लवकरच नवरात्रोत्सवाला सुरूवात होणार आहे. १० दिवस चालणारा हा उत्सव देशभरात वेगवेगळ्या पद्धतींनी साजरा होतो. कोलकत्त्यात या सणाला अत्यंत महत्त्व आहे. तर देशभरातही अनेक ठिकाणी दुर्गा देवींचे पांडाल उभे असतात.

महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या राज्यात घटस्थापना करून हा सण साजरा केला जातो. घरोघरी घट बसवून त्यातील मातीत अनेक बिज पेरले जातात. ते सगळे बिज कोवळ्या कोंबांनी देवघरातील त्या घटात जन्म घेतात. हेच देवीच्या शक्तीचे प्रतिक माणून त्याचे पूजन केले जाते.

नवरात्रीचा सण वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो, ज्यामध्ये शारदीय नवरात्रीचा सण हा सणाचा सण आहे. अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीचा सण साजरा केला जातो. या दरम्यान दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते.

घरात घटस्थापना केली जाते, अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते. 9 दिवसांच्या विशेष पूजेनंतर दसऱ्याला दहाव्या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते.

हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. या 9 दिवसांसाठी शास्त्रांमध्ये काही नियम सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन करणे खूप महत्वाचे आहे. अन्यथा या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास किंवा नवरात्रात झालेल्या काही चुकांमुळे देवी नाराज होऊ शकते. त्याचबरोबर नवरात्रीचे व्रत आणि विधीपूर्वक केलेली पूजा जीवनाला अपार सुख-समृद्धीने भरून टाकते. (Navratri 2023)

नवरात्रीत या गोष्टी टाळा

- नवरात्रीत चुकूनही नखे कापू नका किंवा केस कापू नका. केस कापणे, नखे कापणे यासारख्या गोष्टी नवरात्र सुरू होण्याआधी करायला हव्यात, अन्यथा त्याचा जीवनावर अशुभ परिणाम होतो.

- नवरात्रीत चामड्याच्या वस्तूंचा वापर करू नये. तसेच चामड्याच्या वस्तू ही विकत घेऊ नयेत. चामड्याच्या वस्तू अशुद्ध असतात. त्या प्राण्यांच्या कातड्यापासून बनविल्या जातात. नवरात्रीमध्ये घरात अशा अस्वच्छ गोष्टी ठेवल्याने नकारात्मकता येते.

- नवरात्रीच्या नऊ दिवसांत पवित्रता आणि सात्त्विकतेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे या 9 दिवसांत मांसाहार खाऊ नका, घरी आणू नका. नवरात्रीत लसूण-कांदा खाण्यासही मनाई आहे.

- नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये. या काळात लिंबू कापणे हे यज्ञासारखे मानले जाते. त्यामुळे लिंबू खाऊ नका किंवा बनवू नका. या 9 दिवसांत लिंबाचे लोणचे खाणे टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT