Navratri Healthy Diet esakal
लाइफस्टाइल

Navratri Healthy Diet : नवरात्रीच्या उपवासात हे पदार्थ एकदा खाऊन तर पहा, पुन्हा पित्त होणारच नाही

उपवासाचा अर्थ असा नाही की आहार घेऊ नये

Pooja Karande-Kadam

Navratri Healthy Diet : नवरात्रीचा सण ९ दिवस चालतो आणि या काळात लोक उपवास करतात. विज्ञानाने देखील हे सिद्ध केले आहे की उपवासामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण उपवासाचा अर्थ असा नाही की आहार घेऊ नये. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, नवरात्रीच्या काळात उपवास करण्यासोबतच आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे.

मात्र नवरात्रीच्या काळात तळलेले फराळ खाण्याऐवजी आरोग्यदायी आहारात काही पदार्थांचा समावेश करणे चांगले राहील. तुम्ही तुमच्या नवरात्रीच्या आहारात नारळाचे लाटे, मखणा आणि फ्लेक्स चिवडा यासारख्या आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करू शकता.

तर इथे आम्ही तुम्हाला नवरात्रीच्या खास चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थांबद्दल सांगणार आहोत.

वरीपासून बनवलेले कटलेट्स

उपवासात खाल्ल्या जाणाऱ्या गोष्टींसोबत वरीचा भातही असतो. त्यावर शेंगदाण्याची चटणी सोबत दही तुम्ही अनेकवेळा खाल्ले असेल. पण नवरात्रीचा उपावस नऊ दिवस असतो. त्यामुळे तो करताना रोज वरीचा भात खाऊन कंटाळा येतो.

तेव्हा तुम्ही वरीचे कटलेट ट्राय करू शकता. यामध्ये रताळे, खडे मीठ, आले, जिरे, काळी मिरी आणि लिंबाचा रस वापरता येईल. हे लक्षात ठेवा की ते बनवण्यासाठी तूप कमी वापरा.

मखाना आणि फ्लेक्स सीड

​​मखना आणि फ्लेक्स सीडपासून बनवलेला चिवडा देखील स्नॅक्स म्हणून खाल्ला जाऊ शकतो. त्यात कॅलरी कमी आणि प्रथिने जास्त असतात. त्यामुळे वजन वाढण्याचा प्रश्नच उभा राहत नाही. तर, तुम्ही गरबा करणार असाल तर हे खाल्ल्याने तुम्हाला अनेकवेळा गरबा करूनही फ्रेश वाटेल. (Navratri 2023)

अननस

नवरात्रीच्या उपवासात अननस खाऊ शकता. अननसमध्ये जास्त प्रमाणात पाणी असते, जे उपवासाच्या वेळी शरीराला हायड्रेट ठेवते. यासोबतच आले आपली पचनक्रिया व्यवस्थित ठेवते. त्यामुळे पित्त आणि पचनाचा त्रास होऊ शकत नाही.

नारळाचे दूध

तुम्ही नारळाच्या दुधापासून अनेक पदार्थ बनवू शकता. तुम्हाला गायीचे किंवा म्हैशीचे दूध आवडत नसेल तर नारळाच्या दूधापासून बनवलेले अनेक पदार्थ तुम्ही ट्राय करू शकता. जे तुम्हाला फ्रेश आणि एनर्जेटीक ठेवतील. तसेच उपवास असेल तर तुम्हाला यामुळे जास्त भूकही लागत नाही.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI News: बनावट विमा आणि एनपीएस विकणे महागात पडणार! रिझर्व्ह बँकेकडून कठोर मार्गदर्शक तत्त्वे जारी; कारवाई काय होणार?

Dividend Stocks: Oil India, Coal India सह या 46 शेअर्सकडे ठेवा लक्ष! डिव्हिडंड आणि बोनसमुळे चर्चेत; मोठा फायदा होण्याची शक्यता

२ अभिनेत्रींसोबत अफेअर, रंगेहात पकडले गेले तरीही नाना पाटेकरांच्या पत्नीने का नाही दिला घटस्फोट?

Latest Marathi News Update : जळगावमध्ये सोने-चांदीच्या दरात घसरण; जीएसटीसह सोने 1.60 लाखांवर

Rajpal Yadav Granted Interim Bail: राजपाल यादवला ‘चेक बाउन्स’ प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर, मात्र....

SCROLL FOR NEXT