Wedding Muhurat 2023 esakal
लाइफस्टाइल

Wedding Muhurat 2023 : लग्नाळुंसाठी नवं वर्ष जाणार आनंदाचं! तब्बल आठ महिने असणार मुहूर्त!

नवीन वर्षात यंदा लग्नाचे खूप मुहूर्त (Wedding Muhurat) आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवीन वर्षात यंदा लग्नाचे खूप मुहूर्त (Wedding Muhurat) आहेत.

Wedding Muhurat 2023 : लग्न करणाऱ्या लग्नाळुंसाठी एक खूशखबर आहे. नवीन वर्षात यंदा लग्नाचे खूप मुहूर्त (Wedding Muhurat) आहेत. यावर्षी तब्बल 8 महिने सनई चौघडे वाजणार आहेत. म्हणजेच, 2023 मध्ये जुलै ते ऑक्टोबर हे चार महिने वगळता इतर आठ महिन्यांत लग्नाचे मुहूर्त असणार आहेत.

या वर्षभरात लग्न समारंभांची (Shubh Vivah Muhurat 2023) मोठी धूम पाहायला मिळणार आहे. नवीन वर्षाला आजपासून सुरुवात झाली असून 2023 मध्ये कोणत्या महिन्यात, कोणत्या तारखांना लग्नाचे मुहूर्त आहेत ते आपण जाणून घेऊ. 2023 हे लीप वर्ष नसल्यामुळं फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस आहेत, त्यामुळं संपूर्ण वर्षाचे दिवस 365 असणार आहेत.

हिंदू पंचांगानुसार, 2023 मध्ये लग्नासाठी तब्बल 64 शुभ मुहूर्त आहेत. त्यापैकी जानेवारीत 9, फेब्रुवारीमध्ये 13, मार्च 6, मे 13, जून 11, नोव्हेंबर 5 आणि डिसेंबरमध्ये 7 लग्नाचे शुभ मुहूर्त आहेत.

लग्नासाठी शुभ मुहूर्त

  • जानेवारी 2023 - 15, 16, 18, 19, 25, 26, 27, 30, 31

  • फेब्रुवारी 2023 - 6, 7, 8, 9 10, 12, 13, 14, 15, 17, 22 23, 28

  • मार्च 2023 - 1, 5,6, 9,11, 13

  • मे 2023 - 6, 8, 9, 10, 11, 15, 16, 20, 21, 22, 27, 29, 30

  • जून 2023 - 1, 3, 5, 6, 7, 11, 12, 23, 24, 26, 27

  • नोव्हेंबर 2023 - 23, 24, 27, 28, 29

  • डिसेंबर 2023 - 5, 6, 7 8, 9, 11, 15

हिंदू पंचांगानुसार एप्रिल, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात लग्न करता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT