Odomos Plant Benefits Mosquito Control Tips esakal
लाइफस्टाइल

Mosquito Control Tips : अगरबत्ती, मॉर्टीननेही डास कमी होईनात? ; हा स्वस्त न् मस्त उपाय करेल मदत!

Mosquito Control Tips: डासांना पळवायचं नॅचरल सोल्युशन सापडलं!

Pooja Karande-Kadam

Odomos Plant Benefits : उन्हाळ्याची चाहुल जशी आपल्याला लागते. तशीच ती डासांनाही लागलेली असते. हिवाळ्यात कमी प्रमाणात सापडणारे डास उन्हाळ्यात मात्र हैराण करतात. त्यांच्यामुळे झोपही होत नाही आणि आजारांना सामोरे जावे लागते.

त्रासदायक डासांना पळवून लावण्यासाठी अगरबत्ती, मॉर्टीन लिक्वीड कामी येत.  पण ते खर्चिकही असतं. त्यामुळे रात्रभर विज जाळायला लागते. आणि अगरबत्तीच्या धुरामुळे इतरांना त्रासही होतो. त्यामुळेच आज एक असा उपाय पाहुया जो निसर्गाने निर्माण केलाय आणि आपल्याला तो फुटक दिलाय.

तुम्हालाही डासांपासून दूर राहण्यासाठी घरगुती आणि नैसर्गिक उपाय वापरायचा असेल. तर तुम्ही घरात 'ओडोमास' वनस्पती लावू शकता. ओडोमास वनस्पतीला डासांना दूर करण्यासाठी सिट्रोनेला वनस्पती म्हणूनही ओळखले जाते. ही झाडे 2 ते 3 फूट उंचीची असल्याने घराच्या अंगणातही लावता येतात.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या झाडांना रोज पाणी देण्याची गरज नाही. ओडोमासच्या झाडाची पाने अंगावर चोळल्याने किंवा त्याचे तेल वापरल्याने डास दूर राहतात. याच्या तेलाचा उपयोग इतर अनेक रोगांवरही होतो.

सिट्रोनेला वनस्पतीचे इतर उपयोग ओडोमास ट्री किंवा सिट्रोनेला देखील औषधी वनस्पती म्हणून वापरतात. याशिवाय त्याची पाने अगरबत्ती सुगंधित करण्यासाठी वापरतात.

डांसाच्या अगरबत्तीने घेतला ६ जणांचा जीव

राजधानी दिल्लीत डासांपासून बचाव करणाऱ्या अगरबत्तीने (क्विल) 6 जणांचा बळी घेतला आहे. शास्त्री पार्क परिसरातील एका घरात काही लोक भाड्याने राहत असल्याची माहिती पोलिसांकडे आहे. खोलीत 9 जणांनी डासांपासून वाचण्यासाठी अगरबत्ती लावली होती, मात्र त्याच्या धुरामुळे गुदमरून 6 जणांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: मठात परतल्यानंतर फटाके, गर्दी अन् हॉर्नचा सामना... माधुरी पुन्हा वनतारामध्ये जाणार? PETA ची सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Latest Marathi News Live Update : 'अद्वितीय धैर्याबद्दल मी त्यांना सलाम करतो'; इस्रायलच्या पंतप्रधानांकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Pune ACB Trap : 'वर्दी'ला पुन्हा कलंक! शिरूरमध्ये 95 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात; गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागत होता 1 लाख

IND vs SL Semi Final : भारताला दिवसा 'चांदण्या' दिसल्या! ९ फलंदाज घेऊन उतरले, पण इशान किशन, वैभव सूर्यवंशीमुळे वाचली लाज

'आपको बाहर जाना पड़ेगा...' मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? Viral Video

SCROLL FOR NEXT