Old Jeans Reuse Ideas esakal
लाइफस्टाइल

Old Jeans Reuse Ideas : जुनी जीन्स फेकून द्यायचा विचार करताय? पहा आधी या वस्तू मग ठरवा

फेकून दिलेल्या जीन्स कचऱ्यात जातात आणि त्या प्रदुषण करतात

सकाळ डिजिटल टीम

Old Jeans Reuse Ideas : एक जीन्स बनवण्यासाठी जेवढा कापूस लागतो. तो कापूस वाढवण्यासाठी सुमारे 946 लिटर पाणी लागते. आणि त्यानंतर जीन्स बनवण्यासाठी आणि टेक्सचर करण्यासाठी सुमारे 42 लिटर पाणी लागते?. होय, तूम्ही ऐकताय ते खरे आहे. इतके लिटर पाणी वापरून बनवलेली जीन्स तूम्ही काही दिवस घालता आणि फेकून देता.

फेकून दिलेल्या जीन्स कचऱ्यात जातात आणि त्या प्रदुषण करतात. एव्हढेच होते. त्यामूळे असा प्रश्न असा पडतो की, हे सर्व थांबवायचे कसे? यासाठी अनेक जीन्स थोडी कापून त्याची थ्री फोर किंवा शॉर्ट करतात. पण, आता त्याचा वापर पून्हा करता येईल अशा काही भन्नाट कल्पना पाहूयात. ज्या मूळे तूमचे घर, ऍक्सेसरीज आणि मोबाईलही सुशोभित करता येतील.

बॉटल बॅग

पाण्याची बाटली ही गरजेची वस्तू आहे पण त्यासाठी बॅगमध्ये जागा नसते. त्यामुळे बॉटल बाहेरून विकत घेतली जाते. पण आता बॉटल बॅगमुळे तुम्हाला विनाकारण खर्च करण्याची गरज नाही. जीन्सपासून बनवलेल्या बॅग्स बाटली ठेवण्यास आणि ती सोबत नेण्यास आरामदायक आहेत. तसेच, मुलांसाठी या जीन्स बॅग्स बनवणे कमी खर्चिकही आहेत.

पर्स, साइड पर्स

जून्या जीन्सपासून लहान मोठ्या आकाराच्या अनेक पर्स बनवता येतात. बाजारात पर्स खरेदी करताना जीन्समधील अनेक वॉलेट, पर्स पाहता येतात. याच पर्स तूम्ही घरीही बनवता येतात. त्याला खर्चही कमी येतो. त्या पर्सना तूम्ही तूमच्या नावातील कॅपिटल्सनेही डेकोरेट करू शकता.

कुशन

घरात सोफ्यावर आणि बेडवर वापरण्यासाठी अनेक प्रकारच्या कुशन्स लागतात. त्यांचे कव्हर अधिक आकर्षक असतील तर त्या दिसायला छान दिसतात. त्यामूळे घरातील सोफा कुशनचे कव्हर तूम्ही जीन्सपासून बनवू शकता.

किल्ली स्टँड

तूम्हाला तर माहितीच आहे की, जीन्सला अनेक खिसे असतात. ते सर्व खिसे एकाच कापडावर एकत्रितपणे जोडून तूम्ही असे खास किल्ली, मोबाईल स्टॅंड बनवू शकता.

मोबाईल स्टँड कव्हर

मोबाईल चार्जिंगला लावल्यावर अनेकदा तो ठेवायला आपल्याला कपाटाचा, भिंतीचा आधार घ्यावा लागतो. अचानक धक्का लागल्याने मोबाईल पडण्याची भिती असते. त्यामूळे जीन्सपासून सोपी आणि सुरक्षित मोबाईल चार्जिंग बॅग बनवता येते.

बेल्ट आणि मोबाईल ऍक्सेसरीज

जीन्सचे कापड रंग गेला तरीही आकर्षकच वाटते. त्यामूळे तूमच्या डोक्यात येतील त्या भन्नाट कल्पना वापरून तूम्ही जुनी जीन्स सत्कारनी लावू शकता. या जीन्सपासून ड्रेस, फ्रॉकसाठी बेल्ट,मोबाईल कव्हरही बनवू शकता. या वस्तू तूम्ही बनवायला शिकलात कि त्याची मागणी मित्रांमध्येही व्हायला लागेल. त्यामूळे त्यातून तूम्ही नफाही मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

Dr. Ambedkar Birthplace Ambadwe : बाकी सगळं ठीक, पण विकास कुठेय? डॉ. आंबेडकरांच्या मूळ गावातील रखडलेली कामे पाहून तुमचाही होईल हिरमोड; पाहा वास्तव

हनीमूनच्या रात्री वधूच्या धक्कादायक अटी, संबंध ठेवण्यासाठी ९० लाखांची मागणी; पैसे न दिल्यानं केलं भयंकर कांड

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

SCROLL FOR NEXT