Master Chef Pankaj Onion Cutting Tips esakal
लाइफस्टाइल

Onion Cutting Hack: एवडूसा गडू पण त्याला कापताना आता नाही येणार रडू... मास्टरशेफ पंकजच्या खास टिप्स

कांदा चिरणे हे काही सोप्पं काम नाही. फक्त कांदा चिरण्याच्या नावानेच लोकांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात

Lina Joshi

Master Chef Pankaj Onion Cutting Tips : स्वयंपाक टेस्टी बनवायचा असेल तर त्यात एक पदार्थ आवर्जून टाकतात अन् तो म्हणजे कांदा. कांदा हा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे जो आपल्या जेवणातली चव सुधारण्यासाठी वापरला जातो. त्यात जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल तर तुम्ही कांद्याकडे दुर्लक्ष करु शकत नाही.

पण कांदा चिरणे हे काही सोप्पं काम नाही. फक्त कांदा चिरण्याच्या नावानेच लोकांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. कांदा चिरताना तुमच्याही डोळ्यात पाणी येत असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा.

घरी आपण जेव्हा कांदा चिरतो तेव्हा अश्रूंच्या धारा लागतात पण तेच बाहेर कोणाला कांदा चिरतांना बघाव त्यांना काहीही होत नाही. हे कसं शक्य आहे हा प्रश्न पडतो ना? याच साठी मास्टर शेफ पंकज यांनी या काही खास टिप्स आपल्या इंस्टाग्राम अकाऊंट वरुन शेयर करत आपल्याला दिल्या आहेत, चला बघूया अशा कोणत्या टिप्स आहेत?

कांदा चिरतांना अश्रू का येतात?

कांदा चिरतांना, कांद्याच्या आतील पेशी तुटतात, ज्यामुळे सल्फेनिक ऍसिड तयार होतो. हे ऍसिड नंतर एन्झाईममध्ये मिसळून प्रोपेनेथिओल एस-ऑक्साइड नावाचा वायू तयार करतो. जेव्हा हा वायू आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो तेव्हा तो पाण्यासोबत मिसळून सल्फ्यूरिक ऍसिड तयार करतो. त्यामुळे डोळ्यात काटा येतो आणि अश्रू येऊ लागतात.

कांदा चिरतांना अश्रू कसे टाळावेत?

मास्टरशेफ पंकज सांगतात की कांदा चिरतांना तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर

१. नेहमी कांदा चिरण्यापूर्वी सोलून त्याचे दोन भाग करा आणि काही वेळ पाण्यात भिजत ठेवा.

२. तुम्ही कांदे चिरण्या आधी तोंडात च्युइंगम ठेवा आणि ते चघळताना कांदा चिरुन घ्या. याच्या मदतीने तुमच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत.

३. कांदा चिरण्यापूर्वी १५-२० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. असं केल्याने कांद्यामध्ये असलेले एन्झाइम कमी होते (ज्यामुळे डोळ्यांत पाणी येते). त्यामुळे चिरतांना डोळ्यातून पाणी येत नाही.

या युक्तीनेही अश्रू येणार नाहीत

१. चिरण्यापूर्वी कांद्याच्या मुळाचा भाग कापून वेगळा करा.

२. धारदार चाकू वापरा.

३. खुल्या हवेत किंवा पंख्यासमोर कांदे कापून घ्या.ki

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT