Palazzo Fashion Tips sakal
लाइफस्टाइल

Palazzo Fashion Tips: रेग्युलर प्लाजो वर अशा टॉप्सने क्रिएट करा वेस्टर्न लुक

प्लाझो पँटस हा सगळ्यात कम्फर्टेबल पँटसचा प्रकार आहे .

Aishwarya Musale

आजकाल टिकाऊ फॅशनकडे विशेष लक्ष दिले जात आहे. सध्या प्लाझो पँटचा ट्रेंड खूपच कॅप झाला आहे. या पँट परिधान करण्यासाठी खूपच आरामदायक आहेत. प्लाझो पँटची खास गोष्ट अशी आहे की, सर्व वयोगटातील महिला वेगवेगळ्या शैलीने याला परिधान करू शकतात.

प्लाझो पँटस हा सगळ्यात कम्फर्टेबल पँटसचा प्रकार आहे आणि तितकाच जास्त ट्रेंडी सुद्धा. अगदी ऑफिस वेअर पासून तर क्लासी लुक साठीही तुम्ही प्लाझो घालू शकतात. प्लाझो पँटस म्हटलं तर लोकं अनेकदा त्या वरती कुर्ता घालतात. पण तुम्ही प्लाझो पँटस सोबत वेस्टर्न लूकही करू शकतात.

1. टॅंग टॉप आणि प्लाझो

एका परफेक्ट आणि तितक्याच कम्फर्टेबल लुकसाठी ही स्टाइल जाऊ शकते. प्लेन टॅंग टॉपवरती तुम्ही ऑक्सिडाईज लॉन्ग नेकलेस घालू शकतात किंवा कॉटनचा स्कार्फही घेऊ शकतात. याने तुमचा लुक उठून दिसेल.

2. ऑफ शोल्डर टॉप आणि प्लाजो

ऑफिसच्या एखाद्या पार्टीला किंवा वीकेंड मूव्ही प्लॅनसाठी हा लुक परफेक्ट आहे. याने तुम्ही एक ट्रेंडी लुक क्रिएट करू शकतात. याखाली हील्स सुद्धा छान दिसतील.

3. डेनिम शर्ट आणि प्लाझो

एक कम्फर्टेबल ऑफिस वेअर प्रत्येकाला हवा असतो. डेनिम शर्ट आणि हाय वेस्ट पलाजो हे खूप सुंदर कॉम्बिनेशन असू शकत. तुम्ही अगदी ऑफिसच्या मीटिंगला सुद्धा हा लुक क्रिएट करू शकतात.

4. क्रॉप टॉप, लॉन्ग श्रग आणि प्लाझो

जर तुम्हाला ट्रेडिशनल लुक तयार करायचा असेल तर छान एमरोडरी केलेला क्रॉप टॉप आणि त्यावर लॉन्ग श्रग हे सुद्धा छान दिसेल. अगदी लग्नातही तुम्ही हा लुक क्रिएट करू शकतात. यावरती हेवी ज्वेलरी छान दिसेल.

5. शॉर्ट कुर्ता आणि प्लाझो

शॉर्ट कुर्ता सध्या सगळेच प्रेफर करता आहेत. त्या खाली जीन्सच्या ऐवजी प्लाझो सुद्धा खूप सुंदर दिसेल. शिवाय ऑफिससाठी, रेग्युलर वेअर म्हणून किंवा बाहेर फिरायलाही ही स्टाइल जाऊ शकते. यावरती ऑक्सिडाईज ज्वेलरी खूप सुंदर दिसतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT