Paneer Rostie Sakal
लाइफस्टाइल

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात वेगळे काही खाण्याची इच्छा असेल तर पनीर रोस्टी ट्राय करू शकता.

Puja Bonkile

सकाळच्या नाश्त्यात पौष्टीक आणि सकस पदार्थांचा समावेश करणे गरजेचे असते. यामुळे तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत नाही. सकाळच्या नाश्त्यात पौष्टीक आणि चवदार काही खाण्याची इच्छा होत असेल तर पनीर रोस्टी ट्राय करू शकता. हा पदार्थ बनवायला सोपा आणि चवदार आहे. तसेच पनीर खाणे आरोग्यदायी असते. चला तर मग जाणून घेऊया पनीर रोस्टी कसे बनवतात.

पनीर रोस्टी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

सुजी

दही -1/2 कप

पानी -1/2 कप

इनो -1कप

जीरं -1कप

मोहरी1/2 कप

हिरवी मिरची -1कप

कांदा-1/2कप

मटर -1/4 कप

गाजर -1/4 कप

शिमला मिरची -1/4 कप

पनीर -1कप

चिली फ्लेक्स -1tsp

मीठ चवीनुसीर -1tsp

कोथिंबीर

कृती

सर्वात आधी एका भांड्यात रवा, दही आणि पाणी घालून चांगले मिसळा आणि सुमारे 10-15 मिनिटे बाजूला ठेवा.

नंतर एका कढईत 1 चमचा तूप किंवा तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या.

तुम्ही आवडत्या भाज्या गाजर,शिमला मिरची,मटार मिक्स करू शकता. नंतर चीज, चिलीफ्लेक्स आणि मीठ घाला.

रव्याच्या मिश्रणात ते चांगले मिक्स करा. आवश्यक असल्यास आणखी पाणी घाला, शेवटी इनो घाला आणि मिश्रण सक्रिय करण्यासाठी थोडे पाणी घाला आणि लगेच रोस्टी बनवा.

रोस्टी बनवण्यासाठी फक्त एक लहान नॉन-स्टिक पॅन गरम करा, त्यावर तेल लावा आणि त्यावर पिठ घाला आणि दोन्ही बाजूंनी शिजवा. तुमच्या टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत आस्वाद घेऊ शकता.

हिरवी चटणी कशी बनवावी?

हिरवी मिरची – ८-९

आलं - १ इंच

लसूण -10-11

हरभरा डाळ - 1/4 कप

लिंबू रस - 1/2 लिंबू

कृती

हिरवी मिरची, आलं, लसूण, हरभरा डाळ मिक्सरमध्ये बारिक करून घ्यावे. नंतर एका वाटीमध्ये काढावे. त्यात लिंबाचा रस मिक्स करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test : एकदिवस आधी रिटायर्ड हर्ट झाला, दुसऱ्या दिवशी फलंदाजीला उतरला... पण KL राहुलचं शतक थोडक्यात हुकलं!

Pune Restrictions: महत्त्वाची बातमी! पुण्यात १८ ते ३१ ऑगस्टपर्यंत जमावबंदी; कोणत्या गोष्टींवर असणार बंदी अन् का? जाणून घ्या...

Amit Shah: सोनिया गांधींच्या 'त्या' कृतीवर अमित शाह संतापले! चित्तोडगडमधून साधला निशाणा; म्हणाले, देशाची माफी मागा...

Nagpur Police Endlife: नागपूरमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाची साडीने गळफास घेऊन जीवन संपविले; पोलिस दलात खळबळ, कारणांचा तपास सुरू

LPG Supply: स्वयंपाकाच्या गॅसवर केंद्राचा मोठा निर्णय! २१ कंपन्यांसाठी LPG उत्पादनाचा कोटा निश्चित; केंद्राची नवी रणनीती

SCROLL FOR NEXT