मुलांना लवकर झोपविण्यासाठी हे करा Esakal
लाइफस्टाइल

Child Care तुमची मुलंदेखील रात्री उशिरापर्यंत झोपत नाही, मुलांना लवकर झोपवण्याचे काही उपाय

मुळात मुलांना झोप न येण्यामागचं कारणं काय हे शोधून काढल्यास काही वेळेस आई वडीलांना त्यावर तोडगा काढूणं सोपं होईल आणि मुलं वेळेत झोपतील. यासाठी मुलांना झोप न येण्यासाठी कोणती कारणं जबाबदार असतात आणि त्यावर कसा तोडगा काढता येऊ शकतो ते पाहुयात

Kirti Wadkar

रात्री मुल लवकर झोपचत नाही किंवा अंथरुणात गेल्यावरही खेळत बसतं अशा अनेक पालकांच्या तक्रारी असतात. मुलांना झोपण्यासाठी अनेक पालक लाख प्रयत्न करूनही मुलं काही वेळेत झोपत नाहीत. ज्यामुळे पालक Parents त्रस्त असतात. Parenting Marathi Tips How to Make your child sleep early

दिवसभर ऑफिस किंवा घरातील कामं House Work केल्यानंतर कधी एकदा झोपी Sleep जातोय असं अनेक  आई-वडिलांना वाटत असतं. अंथरुणात गेल्यानंतर मात्र मुलं काही झोपू देत नाही. सतत बडबड करणं किंवा आई वडिलांना अनेक प्रश्न विचारणं आणि खेळण्यासाठी Play हट्ट धरणं या मुलांच्या वागण्याने अनेक आई वडील हैराण होतात. 

मुळात मुलांना झोप न येण्यामागचं कारणं काय हे शोधून काढल्यास काही वेळेस आई वडीलांना त्यावर तोडगा काढूणं सोपं होईल आणि मुलं वेळेत झोपतील. यासाठी मुलांना झोप न येण्यासाठी कोणती कारणं जबाबदार असतात आणि त्यावर कसा तोडगा काढता येऊ शकतो ते पाहुयात

झोपण्यापूर्वी २ तास आधी जेवण- मुलांनी रात्री वेळेत झोपावं यासाठी मुलांना रात्री झोपण्याच्या वेळेच्या किमान २ तास आधी जेवण द्यावं. उशीरा जेवल्यामुळे त्यांची पचनक्रिया सक्रिय राहिल्याने त्यांना झोप येत नाही. खास करून रात्री गोड पदार्थ जेवणात दिल्यास मुलं जास्त सक्रिय होतात आणि ते वेळेत झोपत नाहीत. यासाठी मुलांना संध्याकाळ नंतर गोड पदार्थ खाण्यास देऊ नये. 

झोपताना गरम दूध द्या- लवकर जेवल्यामुळे कदाचित मुलांना रात्री भूक लागू शकते आणि ते काही खाण्याचा हट्ट धरू शकतात. अशा वेळी त्यांना इतर पदार्थ देण्याएवजी झोपण्यापूर्वी त्यांना कोमट दूध पिण्यास द्यावं. गरम दूधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं केमिकल झोप येण्यासाठी मदत करतं. तुम्ही दूधामध्येय थोडं जायफळ टाकून देखील त्यांना देऊ शकता. यामुळे मुलांना लवकर आणि गाढ झोप येईल. 

हे देखिल वाचा-

दिवसभर पुरेसं पाणी द्या- मुलांना दिवसभर पिण्यासाठी पुरेसं पाणी द्या. अनेकदा मुलं खेळण्यात किंवा इतर गोष्टींमध्ये गुंतल्याने स्वत:हून पाणी पित नाहीत. यासाठी त्यांना वेळोवेळी पाणी पिण्याची सवय लावा. दिवसभर शरीर हायड्रेट राहिल्यांने त्यांना रात्री तहान लागणार नाही. अनेकदा रात्री पाणी प्यायल्याने त्यांना सतत टॉयलेटला जावं लागतं. यामुळे देखील त्यांची झोप मोड होते. 

मुलांनी सक्रिय राहणं गरजेचं– अलिकडे मैदानी खेळ किंवा ज्यात शरीर सक्रिय राहिल असे खेळ खेळणं कमी झालं आहे. मुलं मोबाईल किंवा टीव्ही पाहण्यात जास्त वेळ घालवतात. अशात त्यांच्या डोळ्यावर ताण येत असला तरी शरीर मात्र सक्रिय राहत नाही किंवा ते फार थकत नाहीत. 

यासाठी मुलांना संध्याकाळी ग्राउंड, गार्डन किंवा गच्चीवर खेळण्यासाठी पाठवा. दिवसभरातही ते सायकलिंग किंवा इतर आउटडोर खेळ खेळतील याची काळजी घ्या. मुलांच्या शारीरिक विकासासाठी तर याची मदत होईलच. शिवाय दिवसभर थकल्यामुळे त्यांना रात्री लवकर आणि शांत झोप लागेल. 

झोपण्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती- झोपण्यापर्वी घरामध्ये किंवा खोलीमध्ये योग्य वातावरण तयार करणं गरजेचं आहे. घरातील इतर व्यक्ती किंवा आई-वडील आपापली कामं करत असतील किंवा टीव्ही पाहत असतील तर मुलं लवकर झोपणार नाहीत. यासाठी झोपण्यापूर्वी काही वेळ आधीपासूनच मोबाईल आणि टीव्हीचा वापर बंद करा. खोलीतील लाइट बंद करा. 

मुलं अंधाराला घाबरत असतील तर डीम लाइट सुरू ठेवा. दारं बंद करा. झोपण्याच्या खोलीत आवाज आणि गडबड नसेल याची काळजी घ्या. यामुळे मुलं लवकर झोपतील. 

हे देखिल वाचा-

मुलांना झोपवण्याच्या काही इतर ट्रीक्स

  • जर तुमचं मुल पाच वर्षांहून लहान असेल तर त्यासाठी झोपण्यापूर्वी त्यांना एखादी गोष्ट किंवा काही लहान मुलांची गाणी ऐकवा. मोबाईलवर गाणी लावू नये. पालकांनी त्यांना गोष्ट ऐकवावी. 

  • तुम्ही एखादी अंगाई म्हणू शकता.

  • कोमट तेलाने मुलांचे तळवे मालिश करा.

  • मुलांना झोपण्यापूर्वी हात पाय धुवून किंवा आघोळ करून झोपवावं.

  • त्यांच्या झोपेचे रोजची वेळ निश्चित करावी. तसचं सकाळी उठण्याची वेळही निश्चित करावी.

  • लहान मुलांना दुपारची झोप गरजेची असते मात्र तरी त्यांना जास्त वेळ झोपू देऊ नये. 

अशा काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुमची मुलं देखील रात्री नक्की लवकर झोपतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT