Parenting Tips in Marathi  
लाइफस्टाइल

Parenting Tips : मुलांना कधीच या गोष्टी बोलू नका? मुलं जास्तच बिघडतील!

तुमच्या मुलांना असे टोमणे देत असाल तर ही सवय सुधारण्याची गरज आहे

Pooja Karande-Kadam

Parenting Tips : सध्याच्या धावपळीच्या स्पर्धात्मक युगात आधुनिक पालकांचे आपल्या मुलांकडे होणारे दुर्लक्ष एक मोठी समस्या आहे. कारण मुलाला गरज असतानाच जर पालक जवळ नसतील तर अशाने पालक आणि मुलांमधील दुरावा वाढत जाऊन खूप मोठे रूप घेऊ शकतो.

मुलगा आपल्या पालकांचा राग करू शकतो. त्यांच्या मनात आपल्या आई वडिलांविषयी काहीच प्रेम राहणार नाही.

 मुलांकडून काही चूक झाली तर पालकांनी त्यांना प्रेमाने समजावून सांगावे आणि त्यांची टिंगल करू नये. असे केल्याने मुलांना त्रास होऊ शकतो. सुधारण्याऐवजी खराब होऊ शकतात. मुलांना टोमणे मारणे टाळा आणि या गोष्टींचे पालन करा.

 मुलांवर पालकांचे प्रेम सर्वात खरे असते. प्रत्येक मुलाला त्यांच्या पालकांचे लक्ष वेधून घ्यायचे असते. अनेकवेळा पालक मुलांना चुकीच्या वागणुकीसाठी टोमणे मारतात, तरीही प्रेम कमी होत नाही. अर्थात हे सर्व मुलांच्या चांगल्या संगोपनाचा एक भाग आहे.

मात्र, अनेकवेळा पालक रागावतात आणि मुलांना असे टोमणे देऊ लागतात. ज्याचा विपरीत परिणाम तुमच्या मुलांवर दिसून येतो. हे टोमणे मुलांना दुखावतातच, पण मुलांचे बिघडवतात. तुम्हीही तुमच्या मुलांना असे टोमणे देत असाल तर ही सवय सुधारण्याची गरज आहे. मुलांना कोणते टोमणे टाळावेत ते जाणून घेऊया.

 तू नाटकं करतोय

अनेक वेळा मुलांच्या म्हणण्याप्रमाणे पालक मुलांना वागू देतात. आणि नंतर त्याचा हट्ट करायला लागले की पालक सहज बोलतात नाटकं करणं बद कर, असं त्यांना म्हणू नका.

कारण, नाटक करणे हा शब्द मुलांना दुखवू शकतो. त्यामुळे मुले स्वतःला भावनिकदृष्ट्या कमकुवत समजू लागतात. तुमचं असं बोलणं त्याच्या भावनिक पैलूला अधिक दुखावण्याचे काम करतो. म्हणूनच मुलांच्या भावना समजून घ्या आणि त्यांच्या क्रियाकलापांना नाटक म्हणणे टाळा.

मुलांना मूर्ख म्हणू नका

पालक रागावतात आणि आपल्या मुलांना मूर्ख म्हणतात. असे जर तुम्ही मुलाला सांगितले तर त्यांच्या आत्मविश्वासाला तडा देण्याचे काम होते. मूर्ख हा शब्द अपशब्द आहे. असे बोलल्याने मुलाच्या भावना दुखावतात. असे बोलून मुलं स्वतःला इतरांपेक्षा कमी लेखू लागतात.

आता मला सहन होत नाहीय

मुले चुका करतात तेव्हा पालक म्हणतात की अशा वाईट सवयी ते सहन करणार नाहीत. पण मुलांना सुधारण्यासाठी असे शब्द बोलणे योग्य नाही. असे केल्याने मुलामध्ये तुमच्याबद्दल भीती निर्माण होते. यानंतर मुलंही पालकांपासून अनेक गोष्टी लपवू लागतात.

तुला काय करायचंय

जेव्हा पालक काहीतरी करतात ज्यावर मुले प्रश्न करतात. यावर पालक म्हणतात तुला काय करायचंय. असे म्हणणे हा आतापर्यंतचा सर्वात वाईट टोमणा आहे. जेंव्हा तुम्ही तुमच्या मुलाला हे बोलता तेंव्हा तो नेहमी स्वतःला चुकीचा समजतो. म्हणूनच मुलाला असे टोमणे देणे टाळले पाहिजे.

तू असे का आहेस

तुमच्या मुलाला इडियट, गिमिक, इडियट अशा शब्दांनी वारंवार हाक मारल्याने मुलाला त्रास होऊ शकतो. असे शब्द तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलासाठी चुकीचे आहेत.

यामुळे मुलांच्या भावना तर दुखावतातच शिवाय त्यांच्यात असुरक्षिततेची भावनाही निर्माण होते. या शब्दांनी मुलांना पुन्हा हाक मारणे म्हणजे त्यांचा आत्मविश्वास तुटणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT