Good Parenting Tips Sakal
लाइफस्टाइल

Parenting Tips: मुलांना घरी एकटे सोडण्यापूर्वी करा 'हा' होमवर्क

Parenting Tips: अनेकदा मुलांना घरी एकटे सोडून आई-वडिलांना बाहेर जावे लागते.

सकाळ डिजिटल टीम

Parenting Tips: अनेकदा मुलांना घरी एकटे सोडून आई-वडिलांना बाहेर जावे लागते. आपण बाहेर पडतो मात्र, आपले मन सतत मुलांमध्ये गुंतून असते. मुलं घरी सुरक्षित असतील काय? त्यांनी घरात उलट-सूलट कारभार तर करून ठेवला नसेल? असे असंख्य प्रश्न आपल्या मनात घर करतात. नोकरी करणाऱ्या पालकांसाठी तर हा सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. अशा वेळी काही बाबींवर लक्ष केंद्रीत केले तर आपल्याला संभाव्य धोके टाळता येऊ शकतात.

या मुलांना घरी एकटे सोडू नका -

‘अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स’ या संस्थेच्या रिसर्च नुसार, १२ वर्षाखालील मुलांनाच घरी एकटे सोडू नये. कारण, आई-वडील आपल्यावर प्रेम करत नाहीत, अशी भावना या वयातील मुलांमध्ये तयार होते. याचा मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

अशी मुल असतात परिपक्व-

जी मुलं स्वतःहून होमवर्क, तुमच्या कामात मदत आणि सांगितलेली कामे करतात, ती परिपक्व झालेली असतात. त्यांना काही वेळासाठी घरी एकटे सोडता येऊ शकते.

मुलांना शिकवा ह्या गोष्टी-

घराचे दार उघडणे आणि बंद करणे

लाईट सुरू-बंद करणे विद्युत उपकरणांचा धोका आणि वापर

गुड टच आणि बॅड टच

अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार

इमर्जन्सीच्या वेळी मोबाईलचा वापर

बाहेर असताना संपर्क आवश्यक-

बाहेर पडताना विश्वासार्ह शेजाऱ्यांना कल्पना द्यावी

शक्य असेल तर नातेवाईकांकडे मुलांना सोडावे

मुलांना शक्यतो एखाद्या कामात व्यस्त ठेवावे

मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात राहावे

बाहेर पडताना घ्या ही काळजी -

बंद खोलीत मुलाला ठेऊ नये

घर खुले सोडून जाऊ नये

गॅसचे नोजल बंद ठेवावे

विजेचे सॉकेट बंद ठेवावे

खाद्यपदार्थ सहज घेता येईल, अशा जागी ठेवावे

धारदार वस्तू मुलांपासून दूर राहातील अशी व्यवस्था करावी

''मुलं घरी एकटे असतांना आग लागली, चाकूने हात कापला, गॅसचा भडका उडाला तर काय करावे याबद्दल इमर्जन्सी हॅन्डलिंग शिकवावे. तसेच एखादे पार्सल आलं किंवा अननोन कॉलवर काय बोलावे याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. जेणेकरुन मुलं घरी एकटे आहेत असं इतरांना वाटणार नाही आणि ते सुरक्षित राहतील.'' असं नागपूर येथील बालरोग तज्ञ विशाल गाजिमवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT