Parenting Tips esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : मुलांना शिकवण देताना पालक इथेच चुकतात, सद्गुरु सांगतात त्यावर सोपा उपाय

पालकांना सुरुवातील ही भितीसुद्धा असते की मुलांचे संगोपन कसे करावे

साक्षी राऊत

Parenting Tips : पालक जेव्हा पहिल्यांदा आई-वडील होतात तेव्हा हा त्यांच्या आयुष्यातील मोठा आणि सुंदर बदल असतो. त्यांच्या खांद्यावर यापुढे मुलांना घडवण्याची त्यांना योग्य शिक्षण देण्याची जबाबदारी असते. अनेक पालकांना सुरुवातील ही भितीसुद्धा असते की मुलांचे संगोपन कसे करावे. तुम्हाला अशी काहीशी भिती असेल तर सद्गुरु यावर काही सोपे उपाय सांगतात. जे तुमच्या पालकत्वाच्या जबाबदारीत महत्वाची भूमिका बजावतील.

घरातील योग्य वातावरण

मुलांना योग्य आणि प्रसन्न वातावरणात वाढवणे ही पालकांची जबाबदारी असते. सद्गुरुंच्या मते, प्रत्येक व्यक्तीसाठी घरातलं वातावरण सकारात्मक ठेवणे फार महत्वाचे असते. घरात आनंद प्रेम आणि चांगले वातावरण मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी फार महत्वाचे असते.

प्रत्येक मुलं वेगळी असू शकतात

काही पालक त्यांच्या मुलांसोबत फार शिस्तीत वागतात. असे वागल्यास त्यांना कठीण परिस्थितींची जाणीव होईल असे त्यांना वाटते. काही पालकांना आपण आयुष्यात जे करू शकलो नाही ते आपल्या मुलांनी करून दाखवावे असे वाटते. आणि या अपेक्षेपोटी ते मुलांशी कडक शिस्तीत वागतात. यामुळे मुले हट्टी होतात. मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी पालकांनी कोणत्या वेळेत मुलांशी कसे वागावे हे लक्षात घेणे महत्वाचे.

मुलांना शिकवण्याबरोबरच काही गोष्टी मुलांकडूनही शिका

बहुतेक लोक असे मानतात की मुले जन्माला आल्यापासून बऱ्याच गोष्टी आत्मसात करत शिकत असतात. तेव्हा पालकांनी मुलांना शिकवण देण्याऐवजी मुलांकडून नवनव्या गोष्टी जाणून घ्या. असे केल्याने मुलांसोबतची तुमची मैत्री आणि जवळीक वाढेल.

मुलांना स्पेस द्या

मुलांना स्वातंत्र्य देणे फार महत्वाचे आहे. तुमच्या विचारांचे ओझे त्यांच्यावर लादू नका. त्यांचे पालण-पोषण अशा पद्धतीने करा की ते आई-वडिलांकडून कुठल्याही गोष्टींची अपेक्षा ठेवणार नाहीत. अशाप्रकारे ते प्रत्येक परिस्थितीशी लढण्यास सक्षम असतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Rahuri By-Election: अक्षय कर्डिलेंवरच भाजपचा भरवसा; राहुरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर, विखे पिता-पुत्रांची कर्डिलेंनाच पसंती?

ठरलं तर मगमधील प्रियासाठी सायलीच्या खऱ्या आईने बनवला खास पदार्थ, अभिनेत्री पोस्ट शेअर करत म्हणाली...

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT