लाइफस्टाइल

Parenting Tips: मुलांच्या रागावर असं मिळवा नियंत्रण, या आहेत सर्वात सोप्या टिप्स

तुमची मुलं सतत चिडचिड करतायत? करा 'हे' उपाय

Aishwarya Musale

लहान मुलं जेवढी खळखळून हसतात तेवढाच त्यांना राग ही येतो. मुलांना राग येण्यामागे काही कारणं असू शकतात. लहान-लहान गोष्टीवरुन राग येणे, आपला हट्ट पूर्ण न केल्यास राग येणे, होमवर्क करायचा नाही म्हणून राग येणे अशी अगणित कारण आहेत ज्यामुळे मुलांना राग येऊ शकतो.

मात्र, ही समस्या कशी सोडवायची याच चिंतेत अनेकजण असतात. अनेक कारणांमुळे त्यांना राग येत असतो. तसेच हाच राग ते अनेक माध्यमातून व्यक्त करताना दिसतात. मात्र, याचा प्रत्येकाला त्रास होत असून रागावर नियंत्रण कसे मिळवायचे हेच अनेकांना माहिती नसते. 

मुलाच्या रागाचे कारण समजून घ्या

सर्व प्रथम, आपल्या मुलाला राग का येत आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. त्याला कोणत्या गोष्टीचा त्रास आहे का? त्याला काही भीती आहे का? किंवा त्याला काहीतरी हवे आहे? मुलाच्या रागाचे कारण समजून घेतल्यास ते योग्यरित्या हाताळण्यास मदत होईल.

तुमच्या मुलाला रागावर नियंत्रण कसे ठेवायचे ते शिकवा

रागावर नियंत्रण कसे ठेवावे हे मुलांना शिकवणे महत्त्वाचे आहे. त्यांना सांगा की राग ही एक सामान्य भावना आहे, परंतु त्यांनी ती योग्य प्रकारे व्यक्त करायला शिकले पाहिजे. त्यांना शारीरिक व्यायाम कसा करावा, दीर्घ श्वास घ्यावा किंवा प्रौढ व्यक्तीशी कसे बोलावे ते शिकवा.

मुलाला प्रेम आणि सपोर्ट करा

मुलाला सांगा की तुम्ही त्याच्या भावना समजून घेताय आणि त्याच्यावर प्रेम करताय. तसेच त्याला सांगा की तुम्हाला त्याला मदत करायची आहे. मुलाला असे वाटले पाहिजे की तो एकटा नाही आणि त्याला तुमचा सपोर्ट आहे.

मुलाच्या रागापासून स्वतःचे रक्षण करा

मुलाच्या रागापासून स्वतःचे संरक्षण करणे देखील महत्त्वाचे आहे. जर मूल हिंसक होत असेल तर त्याला शांत होण्यासाठी वेळ द्या. मुलाच्या रागापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तुम्ही हे देखील करू शकता

  • मुलाला वेगळ्या खोलीत पाठवा.

  • मुलापासून काही अंतर ठेवा.

तज्ञांची मदत घ्या

जर तुम्हाला तुमच्या मुलाला मदत करता येत नसेल तर काउन्सिलर किंवा थेरपिस्ट तुम्हाला तुमच्या मुलाच्या रागाची कारणे समजण्यास मदत करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : हांडेवाडीमध्ये टायर साठ्याच्या शेडला भीषण आग

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

Sangli Girl : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर दमदाटीने दोघांचे शारिरीक संबंध, आणखी दोघांनी त्याच मुलीवर केला विनयभंग; पोलिस म्हणतात...

SCROLL FOR NEXT