Parenting Tips sakal
लाइफस्टाइल

Parenting Tips: मुलांना घरी एकटं सोडताय? लक्षात ठेवा या गोष्टी, येणार नाही कोणतीही अडचण

या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास तुमचे कुटुंब अडचणीत येऊ शकते. कोणते ते जाणून घेऊया.

Aishwarya Musale

Children Care : घर आणि मुलांची काळजी घेणे सोपे काम नाही. जेव्हा नवरा आणि बायको दोघेही काम करत असतात तेव्हा समस्या अधिकच बिकट होते. जर तुम्ही देखील पती-पत्नी नोकरी करत असाल आणि तुमचे मूल घरात एकटे राहत असेल तर तुम्ही काही गोष्टींचा विचार केला पाहिजे.

मुलांना घरी एकटे सोडून आई-वडिलांना बाहेर जावे लागते. आपण बाहेर पडतो मात्र, आपले मन सतत मुलांमध्ये गुंतून असते. मुलं घरी सुरक्षित असतील काय? त्यांनी घरात उलट-सूलट कारभार तर करून ठेवला नसेल? असे असंख्य प्रश्न आपल्या मनात घर करतात. नोकरी करणाऱ्या पालकांसाठी तर हा सर्वाधिक चिंतेचा विषय आहे. अशा वेळी काही बाबींवर लक्ष केंद्रीत केले तर आपल्याला संभाव्य धोके टाळता येऊ शकतात.

या मुलांना घरी एकटे सोडू नका -

‘अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स’ या संस्थेच्या रिसर्च नुसार, १२ वर्षाखालील मुलांना घरी एकटे सोडू नये. कारण, आई-वडील आपल्यावर प्रेम करत नाहीत, अशी भावना या वयातील मुलांमध्ये तयार होते. याचा मुलांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

अशी मुलं असतात परिपक्व-

जी मुलं स्वतःहून होमवर्क, तुमच्या कामात मदत आणि सांगितलेली कामे करतात, ती परिपक्व झालेली असतात. त्यांना काही वेळासाठी घरी एकटे सोडता येऊ शकते.

मुलांना शिकवा या गोष्टी-

  • घराचे दार उघडणे आणि बंद करणे

  • लाईट सुरू-बंद करणे विद्युत उपकरणांचा धोका आणि वापर

  • गुड टच आणि बॅड टच

  • अनोळखी व्यक्तींसोबत व्यवहार

  • इमर्जन्सीच्या वेळी मोबाईलचा वापर

बाहेर असताना संपर्क आवश्यक-

  • बाहेर पडताना विश्वासार्ह शेजाऱ्यांना कल्पना द्यावी

  • शक्य असेल तर नातेवाईकांकडे मुलांना सोडावे

  • मुलांना शक्यतो एखाद्या कामात व्यस्त ठेवावे

  • मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात राहावे

बाहेर पडताना घ्या ही काळजी -

  • बंद खोलीत मुलाला ठेऊ नये

  • घर खुले सोडून जाऊ नये

  • गॅसचे नोजल बंद ठेवावे

  • विजेचे सॉकेट बंद ठेवावे

  • खाद्यपदार्थ सहज घेता येईल, अशा जागी ठेवावे

  • धारदार वस्तू मुलांपासून दूर राहातील अशी व्यवस्था करावी

मुलं घरी एकटे असताना आग लागली, चाकूने हात कापला, गॅसचा भडका उडाला तर काय करावे याबद्दल इमर्जन्सी हॅन्डलिंग शिकवावे. तसेच एखादे पार्सल आलं किंवा अननोन कॉलवर काय बोलावे याचे प्रशिक्षण दिले पाहिजे. जेणेकरुन मुलं घरी एकटे आहेत असं इतरांना वाटणार नाही आणि ते सुरक्षित राहतील.'

(सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT