Parle G Biscuits  esakal
लाइफस्टाइल

Parle-G Biscuits : प्रत्येक घरात चहात बुडवलं जाणारं पार्ले-जी बिस्किट तयार करण्याची आयडिया कशी सुचली?

बिस्किटांवर असलेली ती छोटी मुलगी सुधा मूर्ती आहेत का?

Pooja Karande-Kadam

Parle G Biscuits Success Story:

अगदी अलिकडच्या काळापर्यंत लोकांच्या दिवसाची सुरूवात एक कप चहा आणि पारलेजी बिस्किटाच्या पुड्याने व्हायची. सध्या अनेक व्हरायटी बिस्कीटात उतरल्या असल्या तरी बिस्किट म्हटल्यावर एक नाव समोर येते ते म्हणजे पार्ले-जी. मार्केटमध्ये आता अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या दाखल झाल्या असल्या तरी पारले-जीचा दबदबा कायम आहे.

लहान मुले असोत, वृद्ध किंवा तरुण पुरुष असोत, पार्ले-जीचे नाव जवळपास सर्वांनाच माहिती असेल. हे नाव आणि उत्पादन हा केवळ बिस्किटांचा ब्रँड नसून लोकांच्या भावनांशी जोडलेला आहे. कारण वडिलधाऱ्यांसमोरही पार्ले-जी बिस्किटांचा उल्लेख केला तर नक्कीच ते बालपणात रमतील.

कालांतराने या बिस्किटांचे पॅकेजिंग आणि किंमत बदलली आहे, परंतु तिची चव तशीच आहे. उल्लेखनीय आहे की दुसऱ्या महायुद्धादरम्यान हे भारतीय आणि ब्रिटीश सैनिकांचे आवडते बिस्किट होते.

पारले उत्पादने 'हाउस ऑफ पार्ले' या कंपनीच्या अंतर्गत सुरू करण्यात आली होती. ही कंपनी मोहनलाल दयाल यांनी 1928 मध्ये स्थापन केली होती. त्यांच्या कौटुंबिक व्यवसाय रेशीम तयार करण्याचा असला तरी, त्यावेळी भारत स्वातंत्र्यासाठी लढत होता आणि स्वदेशी चळवळ चालू होती.

त्याच वेळी, मोहनलाल दयाल यांनी एका विले-पार्ले येथील जुन्या कारखाण्यात मिठाईचे युनिट सुरू केले. आणि त्यात बनवलेले पहिले उत्पादन म्हणजे रेंज कँडी. त्याला पार्ले कँडी असे नाव देण्यात आले. मोहनलाल दयाल यांनी हे कन्फेक्शनरी युनिट असेच सुरू केले नाही, तर त्याचे संपूर्ण प्रशिक्षण यंत्रांसह जर्मनीहून आणले होते.

कँडी जसजशी प्रसिद्ध झाली, तसतसे त्याच्या मनात व्यवसाय विस्ताराच्या योजना तयार होऊ लागल्या. नवीन उत्पादन आणण्यासाठी 10 वर्षे लागली आणि पार्लेने 1938 मध्ये पार्ले-ग्लूको नावाने बिस्किटे पहिल्यांदा बाजारात आणली. स्वातंत्र्यापूर्वी पार्ले-जीला ग्लुको बिस्किट म्हणून ओळखले जात असे.

स्वातंत्र्यानंतर ग्लुको बिस्किटांचे उत्पादन बंद झाले. ते तयार करण्यासाठी गव्हाचा वापर केला जात होता आणि त्यावेळी देशात अन्नाचे संकट निर्माण झाले होते, त्यामुळे त्याचे उत्पादन थांबवावे लागले होते. अशा प्रकारे संकटात बंद झाल्यानंतर पार्ले-जी बिस्किटे अस्तित्वात आली.

ज्या वेळी कंपनीने पुन्हा बिस्किटांचे उत्पादन सुरू केले, त्या वेळी अनेक लहान-मोठ्या कंपन्या या बाजारात दाखल झाल्या होत्या. विशेषत: ब्रिटानिया ज्याने ग्लुकोज-डी बिस्किटांच्या माध्यमातून बाजारात आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली होती.

त्याच वेळी, पार्लेने 80 च्या दशकात नावात थोडा बदल करून त्यांची ग्लुको बिस्किटे पुन्हा लाँच केली. त्याचे नवीन नाव होते 'पारले-जी'. यामध्ये 'जी' या शब्दाला पूर्वी 'जीनियस' म्हणून ओळखले जात होते. पण, प्रत्यक्षात त्याचा अर्थ फक्त 'ग्लुकोज' असा होता.

पार्ले-जी हे जगातील सर्वाधिक विकले जाणारे बिस्किट बनले, काही वेळातच पार्ले-जी देशातील लोकांचे आवडते बनले आणि त्याचा व्यवसायही वेगाने वाढू लागला. 90 च्या दशकात दूरदर्शनवरील जाहिरातींद्वारे केलेल्या जाहिरातींनी त्याचा व्यवसाय वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि ती प्रत्येक घरापर्यंत पोहोचली.

2011 मध्ये केलेल्या निल्सनच्या सर्वेक्षणानुसार, पार्ले-जी हा जगातील सर्वाधिक विकला जाणारा बिस्किट ब्रँड होता. स्थापनेपासून पार्लेने या बाजारात अनेक नवीन उत्पादने आणली आहेत, परंतु पार्ले-जीचा दबदबा कायम आहे.

17000 कोटींहून अधिक आहे रेवेन्यू

पार्लेचा प्रवास सुरुवातीच्या टप्प्यात कुटुंबातील फक्त 12 सदस्यांसह सुरू झाला होता आणि आता देशातील 30 लाखांहून अधिक रिटेल स्टोअर्सपर्यंत पोहोचला आहे. एका अहवालानुसार, भारतात दर सेकंदाला ४,००० पेक्षा जास्त पार्ले-जी बिस्किटे खाल्ली जातात. लोकप्रियतेबरोबरच कंपनीचा व्यवसायही वाढला आहे आणि कारखान्याचे नूतनीकरण करून सुरू झालेली कंपनी आता 17000 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल असलेल्या फर्ममध्ये बदलली आहे.

कुटुंबाने सुरू केलेला पार्ले कंपनीचा व्यवसाय तीन भागात चालतो. यामध्ये पार्ले-जी बनवणारी पार्ले उत्पादने, तसेच पार्ले अॅग्रो आणि पार्ले बिसलेरी यांचा समावेश आहे. पार्ले प्रोडक्ट्सच्या इतर लोकप्रिय उत्पादनांबद्दल सांगायचे तर, यामध्ये पार्ले 20-20 कुकीज, पारले आटा, पारले रस्क, हाइड ऍन्ड सिक, मिल्क शक्ती, जिंग, कच्चा मेंगो बाइट आणि इतर पदार्थांचा समावेष आहे.

बिस्किटांवर असलेली ती छोटी मुलगी सुधा मूर्ती आहेत का?

बिस्किटांच्या पॅकेटवर दिसणारी लहान मुलगी कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडतो. सोशल मीडियावर अनेक नावेदेखील चर्चेत आली. यात सुधा मूर्ती यांचे नावही आघाडीवर होते. तर, नागपूरच्या नीरु देशपांडे यांचेही नाव पुढे येत होते. मात्र कंपनीने या सर्व अफवा फेटाळल्या आहेत. पार्ले प्रॉडक्ट्स ग्रुपचे मॅनेजर मयंक शाह यांनी हे दावे फेटाळले आहेत. पार्ले-जीच्या पॅकेटवर दिसणारे मुल हे एक काल्पनिक असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : यापुढे कुणालाही मारलं तर त्याचे व्हिडीओ काढू नका - राज ठाकरे

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT