लाइफस्टाइल

कुलाबापासून ग्रॅण्टरोडपर्यंत! मुंबईतील फेमस १० पारसी कॅफे 

शर्वरी जोशी

दर बारा कोसांवर भाषा बदलते, त्याचप्रमाणे प्रांताप्रमाणे खाद्यसंस्कृतीदेखील बदलते. त्यामुळे प्रत्येक प्रांतानुसार तेथील पदार्थ वेगवेगळे असतात. भारतातही विविध पद्धतीच्या खाद्यसंस्कृती पाहायला मिळतात. यात महाराष्ट्रीय, आगरी-कोळी, दाक्षिणात्य अशा वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थ केले जातात. विशेष म्हणजे आजकाल हे पदार्थ अनेक हॉटेल, रेस्टॉरंटमध्येही सहज मिळतात. त्यातच मुंबईत पारंपरिक पदार्थांसोबतच पाश्चात्य पद्धतीचे पदार्थही सहज मिळतात. यात सध्या पारसी पदार्थांना विशेष पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळतं. मुंबईतही अनेक हॉटेल, रेस्टॉरंट खास पारसी पदार्थांसाठीच ओळखले जातात. यात पारसी पद्धतीने केलेला खिमा पाव, Salli Boti  असे काही पदार्थ प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यामुळे मुंबईतील लोकप्रिय पारसी हॉटेल, रेस्टॉरंट कोणते पाहुयात.

१.Yazdani Bakery -

मुंबईतील सर्वात जुनी आणि लोकप्रिय बेकरी म्हणून Yazdani Bakery कडे पाहिलं जातं. ही बेकरी असण्यासोबतच तो कॅफेदेखील आहे. मुंबईतील फ्लोरा फाऊंटन या भागात असलेल्या या कॅफेमधील अॅपल पाय, बनपाव, केक आणि पेस्ट्री विशेष लोकप्रिय आहेत.

ठिकाण - फोर्ट

वेळ - सकाळ ७ ते संध्याकाळी ७ 

२.  café Excelsior -

मुंबईतील हा कॅफे खासकरुन त्याच्या इंटेरिअरसाठी लोकप्रिय आहे. येथील वातावरण अत्यंत सुंदर असून तेथील पदार्थही विशेष लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे येथील स्टाफ मेंबर आणि तेथील सर्व्हिसही उत्तम असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. येथील खिमा पाव, कटलेट्स आणि धनसाक हे पदार्थ विशेष फेमस आहेत.

ठिकाण - फोर्ट

वेळ - सकाळी ८ ते रात्री ११ 

३. Ideal Corner -

जर तुम्हाला पारंपरिक पारसी पदार्थ खाण्याची इच्छा असेल तर या कॅफेला नक्की भेट द्या. या कॅफेमध्ये खासकरुन ऑफिस कर्मचाऱ्यांची गर्दी जास्त असते. येथेदेखील उत्तम सर्व्हिस देण्यात येते. येथील भेजाफ्राय, मटन धनसाक, creamy Chocolate Mousse तुफान लोकप्रिय आहेत.

ठिकाण - फोर्ट

वेळ - दुपारी १२ ते दुपारी ४

५. Café Military -

फोर्ट भागातील Café Military हा कॅफेदेखील विशेष लोकप्रिय आहे. या कॅफेमध्ये पारसी पद्धतीचे अनेक पदार्थ पाहायला मिळतील. खिमापाव, कॅरमल कस्टर्ड हे विशेष लोकप्रिय आहेत.

ठिकाण- फोर्ट

वेळ - सोमवार ते शुक्रवार, सकाळी ८.३० ते रात्री ९

५. Jimmy Boy -

उत्तम पदार्थ, कॅफेमधील वातावरण या दोन कारणासाठी हा कॅफे खासकरुन ओळखला जातो. या कॅफेची रचना जुन्या काळातील इमारतींप्रमाणे आहे. येथील व्हेजिटेरिअन धनसाक,मटन बेरी पुलाव, चिकन फर्चा आणि सांस नी मच्छी हे पदार्थ विशेष लोकप्रिय आहे.

ठिकाण - फोर्ट

वेळ - दुपारी १२ ते संध्याकाळी ४

६. Merwan & Co -

मुंबईतील प्रचंड लोकप्रिय बेकरी आणि कॅफे म्हणजे मेरवान्स. हा कॅफे वेगवेगळ्या पदार्थांसाठी फेमस आहे. येथील मावा केकचे तर असंख्य चाहते आहेत. केवळ मावा केकच नव्हे, तर प्लम केक, ऑम्लेट आणि बन मस्कादेखील नक्की ट्राय करा.

ठिकाण - ग्रॅण्ट रोड

वेळ  - सकाळी ७ ते संध्याकाळी ६

७. Sassanian Boulangerie -

जवळपास १०० वर्ष जुना हा कॅफे असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे येथील वातावरण ही टिपिकल जुन्या स्टाइलमधील आहे. त्याचसोबत येथील चिकन पफ,धनसाक, बनमस्का, मावा केकदेखील प्रसिद्ध आहेत.

ठिकाण - ग्रॅण्ट रोड

वेळ - सकाळी ७ ते रात्री १०

८.  Kayani Bakery & Co-

मुंबईतील सर्वात लोकप्रिय पारसी कॅफेपैकी एक असलेलं ठिकाण म्हणजे Kayani Bakery & Co.  मरीन लाइन्सपासून हाकेच्या अंतरावर असलेला हा कॅफे तरुणाईमध्ये विशेष लोकप्रिय आहे. येथे बेकरी प्रोडक्ट उत्तम मिळत असल्याचं म्हटलं जातं. त्यातच कुकीज, अकुरी, बीन्स ऑन टोस्ट हे पदार्थ जास्त लोकप्रिय आहेत.

ठिकाण - मरीन लाइन्स 

वेळ -  सोमवार ते शुक्रवार  सकाळी ७ ते संध्याकाली ८.४५ आणि रविवारी सकाळी ७ ते संध्याकाळी ६.४५

९. Paradise-

पारंपरिक पारसी पदार्थांसाठी लोकप्रिय असलेला हा कॅफे कुलाबा येथे आहे. हा कॅफे पदार्थांसोबतच तेथील आदरातिथ्यासाठी कायम चर्चेत असतो. येथील मटन धनसाक विशेष लोकप्रिय आहे.

ठिकाण - कुलाबा

वेळ- सकाळी ११.३० ते रात्री १०.३०

१०. Britannia and Co -

खरं तर पारसी कॅफे किंवा रेस्टॉरंटमधील मांसाहारी पदार्थ विशेष लोकप्रिय असतात. मात्र, या कॅफेचं वैशिष्ट्य म्हणजे येथे मिळणारे शाकाहारी पदार्थ. या कॅफेतील बेरी पुलाव, धनसाक, कॅरमल कस्टर्ड असे अनेक पदार्थ लोकप्रिय आहे.

ठिकाण - Ballard Estate

वेळ - सकाळी ११.३० ते दुपारी ४
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: रेल्वेचा प्रश्न सोडवला आता पुढचा प्रश्न पाण्याचा! मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळ काय असतो हेसुद्धा मराठवाडा विसरून जाईल

Latest Marathi News Updates : उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल, मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी

Mohol News : मोहोळ पोलिसांनी उघड केल्या दोन चोऱ्या, लाखाचा माल हस्तगत चोरटा पोलीसांच्या ताब्यात

Nashik News : ५ कोटींचे बक्षीस: नाशिकच्या ग्रामपंचायतींना समृद्ध होण्याची सुवर्णसंधी

Onion Production : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुदान मिळणार? कांदा प्रश्नावर समितीकडून सकारात्मक हालचाल

SCROLL FOR NEXT