New Year Party Look Esakal
लाइफस्टाइल

Party Looks : न्यू इयर पार्टीसाठी असा करा लूक, हटके लूकचं सगळेच करतील कौतूक

न्यु इयर पार्टीसाठी ट्राय करा हे आऊटफिट, दिसाल हटके

Aishwarya Musale

आता प्रत्येकजण ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्टीचे नियोजन करत आहे. अशा परिस्थितीत कोणी आपल्या घरी पार्टी आयोजित केली आहे तर कोणाला पार्टीला जाण्याचे आमंत्रण मिळाले आहे. अशा परिस्थितीत तुम्ही असे काही आउटफिट स्टाईल करणे महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये तुम्ही वेगळे आणि सुंदर दिसाल.

मग आम्ही तुम्हाला काही हटके लूक सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही स्टाईलीश दिसालच पण सगळ्यांमध्ये उठून देखील दिसाल. अहो, विश्वास ठेवा आणि शॉपिंगच्या तयारीला लागा. 

साडी गाऊन

आजकाल इंडो वेस्टर्न ड्रेसचा ट्रेंड आहे. म्हणूनच प्रत्येकाला या आउटफिट्समध्ये प्रयोग करायला आवडतात. अलीकडेच टीव्ही अभिनेत्री हिना खान साडी गाऊनमध्ये दिसली होती. यामध्ये तिने कट आऊट पल्लूसोबत स्टाइल केली आहे. ज्याची डिझाईन कमाली कॉउचरने केली होती.

यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही तुमच्या पार्टी लुकमध्ये या प्रकारचा आउटफिट देखील जोडू शकता. यामध्ये स्टायलिशही दिसाल. असे आउटफिट्स तुम्हाला 1000 ते 2000 रुपयांना बाजारात मिळतील.

New Year Party Look

क्रेप मॅक्सी ड्रेस

जर तुम्हाला लॉन्ग ड्रेस घालायचा असेल तर तुम्ही क्रेप मॅक्सी ड्रेस घालू शकता. यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल. तसेच तुम्ही सर्वांपेक्षा वेगळे दिसाल. त्याची खास गोष्ट म्हणजे तुम्ही बाजारात किंवा ऑनलाइन विविध डिझाइन पर्यायांसह खरेदी करू शकता.

यामध्ये तुम्हाला फुल स्लीव्हज, कट स्लीव्हज आणि अगदी ऑफ शोल्डर ड्रेसही मिळतील. ज्याला तुम्ही पार्टीमध्ये स्टाइल करू शकता. अशा प्रकारचे ड्रेस तुम्हाला बाजारातून 500 ते 1000 रुपयांना मिळतील.

New Year Party Look

बेल बॉटम पँट विद कोट

जर तुम्हाला जुना ट्रेंड रिपीट करायचा असेल तर तुम्ही बेल बॉटम पँट स्टाईल करू शकता. काजोलने देखील हा काळा आणि राखाडी शिमर ड्रेस परिधान केला आहे. आपण आपल्या आवडीचे आणखी काही पर्याय वापरून पाहू शकता.

हे तुम्हाला काहीतरी नवीन करून पाहण्याची संधी देईल. काजोलचा हा आउटफिट मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे. तुम्ही ते बाजारातून 2000 ते 3000 रुपयांना खरेदी करू शकता आणि पार्टीमध्ये स्टाइल करू शकता.

New Year Party Look

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT