people are surprised to see golden tortoise flying in the air video goes viral on social media 
लाइफस्टाइल

हवेत उडणारी सोन्याची कासवं? जाणून घ्या 'या' व्हायरल व्हिडीओमागील सत्य

सकाळवृत्तसेवा

सध्याच्या काळात सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम झालं आहे. त्यामुळे ट्विटर, फेसबुक,विकिपीडिया यांच्याकडे माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिलं जातं. तर इन्स्टाग्रामकडे मनोरंजनाचा स्त्रोत म्हणून बघितलं जातं. याच कारणामुळे सध्याच्या तरुणाईमध्ये या सोशल मीडियाची तुफान क्रेझ आहे. सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट क्षणार्धात व्हायरल होत असते. मग तो एखादा फोटो असो किंवा एखादा व्हिडीओ. आतापर्यंत अनेक जणांना याच माध्यमातून प्रसिद्धीदेखील मिळाली आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये सोन्याची लहान कासवे हवेत तरंगतांना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण थक्क झाले असून या कासवांविषयी अनेकांच्या मनात कुतुहल निर्माण झालं आहे. खरंच ही सोन्याची कासवं आहेत का? जर ही कासवंच असतील तर ते हवेत कसे उडतात? असे ना नाविविध प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. मात्र, या व्हिडीओ मागील गुपित नुकतंच उघड झालं आहे.
 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ आयएफएस ऑफिसर सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीच्या हातावर सोनेरी रंगाची काही लहान कासवे बसले असून ते एक एक करत हवेत उडत असल्याचं दिसून येत आहे. हा व्हिडीओ शेअर करत, जे बऱ्याचदा चमकतं तेच सोनं असतं, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
 

हवेत उडत असलेली ही कासवं दक्षिण पूर्व आशियामध्ये आढळली असून त्यांची उंची ५-७ मिलीमीटर असल्याचं सांगण्यात येत आहे. केवळ सोनेरीच नव्हे तर अन्य इतर रंगांमध्येदेखील ही कासवं असल्याचं पाहायला मिळतं. यात खासकरुन लाल, तपकिरी हे रंग खासकरुन आढळले जातात. या कासवांना गोल्डबग म्हणूनदेखील ओळखलं जातं. विशेष म्हणजे या कासवांना स्पर्श केल्यानंतर त्यांचे रंगदेखील बदलतात असं म्हटलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsath Video: पैशाने भरलेली बॅग अन् हातात ग्लास घेऊन बेडवर बसले; शिरसाटांचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bitcoin All Time High: बिटकॉइनने गाठला नवा उच्चांक; एका बिटकॉइनसाठी किती रुपये द्यावे लागणार?

Crime News : मुलांना जेवणातून द्यायची झोपेच्या गोळ्या, मग प्रियकर यायचा अन्..., बीनाने अडथळा ठरणाऱ्या पतीचा 'असा' काढला काटा

Artificial Intelligence: 'जमीन, जागांवरील अतिक्रमण रोखण्यासाठी आता ‘एआय’चा वापर'; विकसित महाराष्ट्र-२०४७ साठी ‘महसूल’चे सर्वेक्षण

Donald Trump: मित्रप्रेमासाठी ब्राझीलला आयातशुल्काचा दणका; ट्रम्प यांचा निर्णय, माजी अध्यक्ष बोल्सेनारोंवरील कारवाई अमान्य

SCROLL FOR NEXT