कोल्हापूर: आपली खोली ही आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक आरसाच असते. असे आपण वर्षानुवर्षे ऐकत आलो आहोत. लॉक डाऊन मध्ये तर खास करून आपली बेडरूम महत्त्वाची ठरली. .कारण आपण अनेक जण वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातूनच काम करीत राहिलो. असे करत करत अर्धा वर्षे उलटून गेले आहे. आता जर आपल्याला बेडरूमचा लूकच बदलायचा असेल तर आपण कोणताही जादा खर्च न करता वेगळा लूक करू शकतो. कोणत्याही खोलीतील प्रसन्नता ही त्या ठिकाणी असलेल्या बेडशीट वर अवलंबून असते. आपल्या खोलीची बेडशीट कशा पद्धतीने आपण पसंद करून खरेदी करावी. खरेदी करत असताना कोणती काळजी घ्यावी यासाठी या चार गोष्टी गरजेच्या आहेत. असे केले तर या बेडशीट मुळे आपल्या खोलीचा लूक नक्कीच बदलून जातो.
योग्य रंगाची निवड करा
जर तुम्हाला गडद रंग आवडत असेल तर रंगीबेरंगी असणारे बेडशीट आपण निवडावी. हे बेडशीट आपल्या खोलीला अधिक मनमोहक रंगाने उजळून टाकतात. खासकरून पावसाळ्याच्या दिवसात असे बेडशीट खूपच अल्हाददायक वाटतात. तेच जर आपण सौम्य रंगाचे चाहते असाल तर आपण गुलाबी, निळा, हिरवा अथवा तपकिरी या रंगातील बेडशीट ची निवड करा. यामुळे खोलीचा मूड वेगळाच बनून जातो. पेस्टल कलर उन्हाळ्याच्या दिवसात योग्य असतात. थंडीच्या दिवसात खोलीमध्ये उष्ण हवा अनुभवण्यासाठी प्रायमरी रंगातील बेडशीट महत्त्वपूर्ण ठरतात.
बेडशीट साठी वापरलेल्या सुताची माहिती घ्या
बेडशीटचा संपर्क हा डायरेक्ट त्वचा आणि केसांच्या बरोबर येत असतो. यासाठी बेडशीटच्या कापडाचा दर्जा चांगला असणे आवश्यक आहे. बेडशीटच्या कापडाच्या दर्जा वरून आपल्या खोलीतील भव्यतेचा अंदाज ही होत राहतो. तसेच चेक्स बेडशीट हे आपल्या खोलीला घरपणाचे लुक देत राहतात. सिल्क बेडशीट मुळे आपल्याला लक्झरी लूक वाटतो . जर तुम्ही कॉटनचे बेडशीट निवडला तर तुम्हाला एक निवांत पणाचा अनुभव घेता येतो.
बेडशीट चे पॅटर्न सांगतात अनेक गोष्टी
बेडशीट पॅटर्न हे आपल्या खोलीचा लूक बदलून टाकतात.आपल्या खोलीला आपण कसा लुक द्यावासा वाटतो त्या पद्धतीच्या पॅटर्नचे आपण बेडशीट खरेदी करू शकता. बाजारामध्ये आज अनेक बेडशीट उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही पॅटर्नचे बेडशीट निवडू शकता. अलीकडच्या काळात मीनिमल पॅटर्नचे बेडशीट अधिक पसंतीला उतरत आहेत. यातून एक वेगळा लुक आणि समाधान कारक अनुभूती मिळते. सणाच्या दिवशी हायब्रेंट बेडशीट अधिक पसंतीला उतरतात. लहान मुलांच्या खोलीला एक वेगळाच लुक देण्यासाठी अनेक कार्टून प्रिंटचे बेडशीट ही आज बाजारात आहेत. यामुळे मुले खुश होतात आणि त्यांचा एक नटखटपणाचा अनुभव या खोलीतून दिसतो.
गुणवत्तेवर बरोबर तडजोड करू नका
ज्याप्रमाणे आपण प्रत्येक वस्तू खरेदी करताना चांगल्या गुणवत्तेची खात्री करून घेतो, त्याचप्रमाणे आपण बेडशीट खरेदी करतानाही गुणवत्तेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बेडशीट ची क्वालिटी ही त्यामध्ये असलेल्या सुताच्या दर्जावर अवलंबून असते. सुताचा काउंट जितका जास्त असतो त्या प्रमाणात बेडशीटचा दर्जाही चांगला राहतो. यासाठी180 काउंट सुताचे बेडशीट खरेदी करणे फायदेशीर ठरते.
चला तर मग बेडशीट खरेदी करताना या चार गोष्टींचा विचार करूया आणि रुमला फ्रेश बनवूया.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.