Hand Sanitation
Hand Sanitation google
लाइफस्टाइल

Hand Sanitation : हातांच्या स्वच्छतेची ही पद्धत तुम्हाला आयुष्यभर ठेवेल निरोगी

नमिता धुरी

मुंबई : हात न चुकता धुवावेत हे आपण गेल्या अनेक वर्षांपासून ऐकत आहोत. कोरोना काळात हाताच्या स्वच्छतेचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. हाताची स्वच्छता विविध विषाणूजन्य संसर्ग टाळण्यास मदत करू शकते.

हात धुणे ही काळाची गरज आहे. प्रवासादरम्यान हातावर धूलिकण बसण्याची शक्यता अधिक असते. अशा स्थितीत हात साबणाने स्वच्छ धुवून घेणं गरजेचं असतं, म्हणून प्रवासात हँड सॅनिटायझरचा वापर करावा.

हात धुणे केवळ जंतूंचा प्रसार नियंत्रित करत नाही तर संक्रमणापासून दूर राहण्यास देखील मदत करते. म्हणून, हाताच्या स्वच्छतेचे पालन केल्याने स्वतःला आजारापासून दूर ठेवता येऊ शकते. (perfect method of hand sanitation that leads to healthy life)

निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपले हात स्वच्छ कसे ठेवावेत याबद्दल जागतिक हात स्वच्छता दिनानिमित्त मेडिकव्हर रूग्णालयाचे सल्लागार इंटर्नल मेडिसिन एक्सपर्ट डॉ निखिल वर्गे यांनी काही टीप्स दिल्या आहेत. हेही वाचा - Types of Vedas: वेदांचे प्रकार

एखाद्याने आपले हात कधी धुवावेत ?

जेवण्यापूर्वी आणि नंतर, वॉशरूमला जाऊन आल्यानंतर, कोणतीही वस्तू हाताळल्यानंतर, डायपर बदलल्यानंतर किंवा पृष्ठभाग साफ केल्यानंतर, पाळीव प्राण्यांना स्पर्श केल्यानंतर किंवा बाग ऑफिस किंवा शाळेतून घरी परतल्यानंतर, जखमांवर उपचार केल्यानंतर, हात धुणे आवश्यक आहे.

फोनला स्पर्श करणे, आजारी लोकांच्या संपर्कात येणे, कचरा हाताळणे, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करणे किंवा सोडणे आणि एखाद्याला हात लावल्यानंतर किंवा मिठी मारल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. खोकताना आणि शिंकल्यानंतर तुमचे हात धुणे आवश्यक आहे.

हाताच्या या स्वच्छतेच्या पद्धती निरोगी जीवन जगण्यास मदत करू शकतात

  • हात धुताना गरम पाण्याचा वापर करू नका कारण असे केल्याने त्वचा लवकर कोरडी होऊ शकते. कोमट पाण्याने हात धुणे चांगले.

  • तुम्ही बोटे व्यवस्थित स्वच्छ केल्याची खात्री करा. तुमचे हात, मनगट आणि नखांचा मागचा भाग धुवा कारण जंतू तिथे बसतात.

  • लिंबू किंवा कोरफड असलेले लिक्विड हँडवॉश वापरण्याचा प्रयत्न करा कारण त्यात अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात आणि त्वचेचे पोषण करतात.

  • आपले हात न चुकता स्वच्छ धुवा, कारण यामुळे त्वचेची जळजळ होऊ शकते. टिश्यू किंवा मऊ नॅपकिनच्या मदतीने हात कोरडे करा. जेव्हा आपण आपले हात धुवू शकत नसाल तेव्हा हँड सॅनिटायझर सोबत बाळगा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT