Petrol Diesel Tax
Petrol Diesel Tax  esakal
लाइफस्टाइल

Petrol Diesel Tax : 100 रुपयांच्या पेट्रोलवर किती Tax भरावा लागतो?

Pooja Karande-Kadam

Petrol Diesel Tax : वस्तूंवरील कर वाढला की महागाई वाढते आणि सर्वसामांन्यांच्या खिशाला फटका बसतो. महागाई किती वाढलीय याचा अंदाज घ्यायचा असेल तर फक्त एखादी चक्कर पेट्रोल पंपावर मारा. तिथे लोक ५० रूपयाचं पेट्रोल टाकायला सुद्धा मागे पुढे पाहतात. गेल्या काही वर्षात पेट्रोल लिटरमध्ये नाही तर १००, १५०, ७०० अशा किमतीत टाकलं जातं.

गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, २२ मार्चपासून झालेल्या दरवाढीमुळे इंधन प्रतिलिटर १० रुपयांनी महागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. परंतु स्थानिक करांमुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल वेगवेगळ्या दराने विकले जात आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की १०० रुपयांच्या पेट्रोलसाठी महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात ६५ रुपये कर भरावा लागतो. उर्वरित राज्यांतून जी आकडेवारी समोर आली आहे ती धक्कादायक आहे.

मध्य प्रदेश आणि केरळमध्ये १०० रुपये, राजस्थानमध्ये ६१ रुपये, छत्तीसगड आणि कर्नाटकमध्ये ६० रुपये आणि पश्चिम बंगालमध्ये ५५ रुपये दर आहे.

त्याचप्रमाणे पंजाबमध्ये सुमारे ५३ रुपये, बिहार-झारखंडमध्ये ५२ रुपये, जम्मू-काश्मीरमध्ये ५० रुपये, उत्तर प्रदेशात ४८ रुपये आणि गुजरातमध्ये ४६ रुपये कर आकारला जातो. यात केंद्र आणि राज्य सरकारच्या करांचा समावेश आहे.

आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल रोजी दिल्लीत पेट्रोलचा दर १०५.४१ रुपये आणि डिझेलचा दर ९६.६७ रुपये प्रति लीटर होता. दिल्लीत पेट्रोल चा दर ११८.२६ रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर १०१.९ रुपये प्रति लीटर आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या (२०२१-२२) पहिल्या नऊ महिन्यांत (एप्रिल-डिसेंबर) पेट्रोलियम पदार्थांवरील करातून केंद्र सरकारचे उत्पन्न सुमारे २४ टक्क्यांनी वाढून ३,३१,६२१.०७ कोटी रुपये झाले आहे.

पेट्रोल आणि डिझेलवरील कर सातत्याने वाढत आहेत. २०१४ मध्ये केंद्र सरकार पेट्रोलवर ९.४८ रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क आकारत होते, जे नोव्हेंबर २०२१ मध्ये वाढून ३२.९० रुपये झाले, सध्या ते २७.९० रुपये प्रति लीटर आहे. (Petrol and Diesel)

२०१४ मध्ये केंद्र सरकार डिझेलवर ३.५६ रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क लावत होते, जे नोव्हेंबर २०२१ मध्ये ३१.८० रुपये झाले आणि सध्या २१.८० रुपये आहे. फेब्रुवारी २०२० ते मे २०२० या कालावधीत केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे १३ रुपये आणि १६ रुपये प्रति लिटर वाढ केली होती.

पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत घट

पावसाळ्याच्या सुरुवातीसह शेतीसाठी पेट्रोल-डिझेलची मागणी कमी झाल्यामुळे आणि वाहतूकीमुळे वाहन इंधनांच्या विक्रीत जून २०२३ च्या पहिल्या पंधरवड्यात घट झाली, उद्योगांच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. देशातील सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या इंधनाच्या डिझेलची मागणी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात वार्षिक ६.७% घसरून ३.४३ दशलक्ष टन झाली. तर मासिक आधारावर जूनच्या पहिल्या पंधरवड्यात डिझेलची विक्री ३.४% वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: भारताच्या प्लेइंग -11 मध्ये पंत की सॅमसन? गावसकर म्हणाले, 'यष्टीरक्षक म्हणून तुलना केली तर...'

Exit Polls: अमित शाहांचं 'मिशन १२०' काय आहे? पक्षाला बळकटी देण्यासाठी भाजपच्या चाणक्याची रणनिती; एक्झिट पोलमधून मिळाले संकेत

Porsche Crash Case: अपघातानंतर ब्लड सॅम्पल बदलण्याचा सल्ला कोणी दिला? पुणे पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या आईचा खुलासा

T20 World Cup: न्युयॉर्कमध्ये टीम इंडियाच्या सुरक्षेबाबत हयगय नाही! विराटभोवतीही दिसला सुरक्षारक्षकांचा घेरा, Video Viral

Kolhapur Crime News: मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कारागृहात हत्या, कैद्यांच्या दोन गटात मारहाणीवेळी घडली घटना

SCROLL FOR NEXT