Summer Pet Care:
Summer Pet Care:  Sakal
लाइफस्टाइल

Summer Pet Care: ‘मोती’, ‘टॉमी’ लाही होऊ शकतो उष्माघात, अशी घ्या पाळीव प्राण्याची काळजी

सकाळ वृत्तसेवा

डॉ. अनिल भादेकर, पशुवैद्यकतज्ज्ञ

Pets can also suffer from heat stroke then follow these tips

राज्यात अनेक ठिकाणी तापमान 40 अंशांवर गेले. त्यामुळे पाळीव प्राण्यांना उष्माघात होऊ शकतो. प्रसंगी त्यांचा मृत्यूही होऊ शकतो. अनेकांच्या घरात कुत्री आहेत. त्यांनाही उष्माघाताचा धोका आहे. त्यामुळे पाळीव कुत्र्यांना थंड जागेत ठेवण्यासोबत त्यांच्या आहाराकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मुळातच पाळीव कुत्र्यांमध्ये बहुतांश कुत्री ही विदेशातील किंवा थंड प्रदेशात विकसित झालेल्या जातींची आहेत. ही कुत्री वातावरणाशी जुळवून घेत असली, तरी उन्हाचा कडाका मात्र त्यांच्या आवाक्याबाहेर असतो. त्या तुलनेत गावठी कुत्री घाण पाण्यात किंवा डबक्यात बसून उन्हापासून सहजपणे आपला बचाव करू शकतात. पण, विदेशी जातीची कुत्री स्वतःचा बचाव करण्यास असमर्थ ठरतात. त्यामुळे उष्माघाताच्या एका झटक्यात त्यांचे मृत्यू पावण्याचे प्रमाण खूप अधिक आहे. कुटुंबाचे पाळीव कुत्र्यांसोबत भावनिक संबंध असल्याने कुत्र्यांचा अचानक मृत्यू वेदनादायी ठरतो. त्यासाठी माणसांप्रमाणे त्यांची काळजी घ्यावी लागते.

अशी घ्यावी काळजी

उन्हाच्या कडाक्याच्या आधी सकाळी 7 ते 8 दरम्यान कुत्र्याला खायला द्यावे.

या दिवसांत कुत्र्याचे खाणे कमी होते, हे लक्षात घ्यावे.

ऊन सुरू होताच त्याला कूलरसमोर बसवावे.

सुतळीपासून तयार केलेले पोते पाण्यात भिजवून त्यावर बसविता येईल.

कुत्र्यास भरपूर पाणी पिण्यास द्यावे.

सायंकाळी उतरत्या उन्हात फिरविण्याऐवजी रात्री अंधार झाल्यावर फिरवावे.

दमछाक होईपर्यंत त्याला खेळवू नये किंवा खेळवले नाही तरी चालते.

अशी असते दिनचर्या

ज्या लोकांकडे काळ्या रंगाची कुत्री, मांजर आहेत, त्यांनी सर्वाधिक काळजी घेणे महत्त्वाचे असते. काळा रंग असल्याने त्यांना लवकर ऊन लागू शकते. उन्हाळ्याच्या दिवसांत पाळीव प्राणी सकाळी ६ पासून ते आठपर्यंत सक्रिय असतात. मात्र, सकाळी 8 नंतर ऊन वाढत असल्याने त्यांना एखाद्या थंड वाटत असणाऱ्या जागेवर जाऊन बसावे वाटते. संध्याकाळी सहाला उठून ऊन कमी झाल्याने ते परत सक्रिय होतात.

दिवसभर या प्राण्यांना 4-5 वेळेस पाणी बदलून दिले पाहिजे, सकाळी लवकर आणि रात्री उशिरा जेवण दिले पाहिजे, कूलर किंवा एसीच्या थंड वातावरणामध्ये त्यांना ठेवायला हवे, त्यांना पाण्याचा स्प्रे मारून कपड्याने पुसून घ्यावे, चार दिवसांआड अंघोळ घालणे, उन्हात जाऊ न देणे, माठातले पाणी प्यायला देणे या सर्वांबरोबर उन्हाळ्यात गोचिडाचे प्रमाण वाढत असते, म्हणून नियमित आपल्या पशुवैद्याकडे जाऊन गोचिडचे औषध द्यायला हवे. उन्हातून आल्यावर कधीही या प्राण्यांना थेट कूलर किंवा एसीची गार हवा लागू देऊ नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: AIच्या माध्यमातून भाजपाविरोधी अजेंडा राबवण्याचा झाला प्रयत्न! Open AI चा खळबळजनक दावा

ब्रेकिंग! ‘आरटीई’ प्रवेशाला मंगळवारपर्यंत मुदतवाढ; शिक्षण संचालकांचे आदेश; आता मुदतवाढ नसल्याचेही स्पष्टीकरण

Nagpur Temp : नागपूरमध्ये नोंद झालेलं 56 डिग्री तापमान होतं चुकीचं! हवामान विभागाला का द्यावं लागलं स्पष्टीकरण?

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

SCROLL FOR NEXT