Pickle Making Tips esakal
लाइफस्टाइल

Pickle Making Tips : लोणची बनवताना या 5 टिप्स लक्षात घ्या, लोणची खराब होण्याचं टेंशनच उरणार नाही

या ५ टिप्स लक्षात घेतल्या तर तुमच्या लोणच्याला काहीही होणार नाही

सकाळ डिजिटल टीम

Pickle Making Tips : भारतीय जेवणाच्या ताटात लोणचे नसेल तर जेवणाचं ताट अपूर्ण असल्यासारखं वाटतं. आपली आजी, आई, काकू उन्हाळा आला की आवर्जून लोणची बनवतात. वर्षभर पूरेल आणि टिकेल अशा पद्धतीने स्त्रिया लोणची बनवण्याच्या तयारीत असतात. मात्र बहुतेकदा काही चुकांमुळे लोणची खराब होतात त्यांना बुरशी लागते. तेव्हा या ५ टिप्स लक्षात घेतल्या तर तुमच्या लोणच्याला काहीही होणार नाही.

लोणचे हे खारट, तिखट, मसालेदार चटपटीत असायला हवे. यातील एकही पदार्थ कमी किंवा जास्त झाल्यास तुमच्या लोणच्याची चव बिघडते. तेव्हा लोणची बनवताना नेमकी कोणती काळजी घ्यावी ते जाणून घेऊयात. (Lifestyle)

योग्य मसाले

लोणचे बनवताना या गोष्टीची योग्य काळजी घ्या की लोणच्यात घातले जाणारे मसाले जास्त जुने नसावे. त्यांमुळे लोणच्याची गुणवत्ता आणि चव दोन्ही बिघडू शकते. तसेच लोणच्यात घातले जाणाऱ्या तेलाची निवडही योग्य असावी. ऑलिव्ह ऑइलमध्ये तुम्ही लोणचे बनवू शकत नाही. भारतीय मसाले मोहरीच्या तेलात उत्तम मिसळतात. तेव्हा मोहरीचे तेल हे लोणच्यासाठी उत्तम आहे.

सर्व साहित्य व्यवस्थित मिसळावे

सर्व साहित्य व्यवस्थित मिसळ्यास लोणच्याला स्वाद येतो. त्याची चव वाढते. तेव्हा लोणच्यातील मसाले चमच्याने ढवळण्यापेक्षा हँड ग्लव्ह्ज घालून मिसळल्यास चव वाढते.

लोणच्यातील तेल

लोणच्यात तेलाची निवड करण्याबरोबरच मसाले सगळं घातल्यानंतर लोणचे भरून ठेवलेली बाटली सतत ढवळत राहावी. याची काळजी घ्यावी की तेल तळाशी बसू नये असे झाल्यास लोणचे खराबही होऊ शकते.

लोणचे बनवल्यानंतर ती काही दिवस ठेवा

लोणची बनवल्यानंतर काही लोणची तुम्ही तुरंत खाऊ शकता मात्र काही लोणच्यांना मुरायला वेळ लागतो. साधारण ७-१० दिवसांचा कालावधी लागतो. तेव्हा या दिवसांत लोणच्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. (Summer)

लोणचे साठवण्यासाठी योग्य कंटेनर वापरा

लोणची हा असा पदार्थ आहे जो फार काळ टिकवून ठेवता येतो. तसेच वर्षानुवर्षे टिकतो. तेव्हा लोणच्यांना साठवून ठेवण्यासाठी काचेच्या, स्टिलच्या किंवा प्लिस्टिकच्या जारचा वापर करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT