Hair Cut esakal
लाइफस्टाइल

पितृ पक्षात कटिंग, दाढी का करत नाहीत? जाणून घ्या कारण

सकाळ डिजिटल टीम

हिंदू धर्मात (Hinduism) पितृ पक्षाला (Pitru Paksha 2021) विशेष असं महत्व प्राप्त आहे. पितृ पक्षालाच 'श्राद्ध' असंही म्हटलं जातं. श्राद्धाच्या दिवशी श्राद्धात पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध कर्म त्यांच्या पूर्वजांसाठी केले जाते, जेणेकरून त्यांचा आत्मा तृप्त होऊ शकेल. हिंदू धर्मात पालकांची सेवा ही सर्वात मोठी पूजा मानली जाते. त्यामुळे हिंदू धर्मग्रंथांमध्ये पुत्राला पूर्वजांच्या मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक मानलं गेलंय. प्रत्येकानं आपल्या जन्मदात्या आई-वडिलांना मृत्यूनंतर विसरू नये, म्हणून त्यांचं श्राद्ध करण्यासाठी विशेष कायदा सांगितला गेलाय. यावर्षी पितृ पक्ष 20 सप्टेंबर पासून सुरू होत असून 6 ऑक्टोबर रोजी अश्विन अमावास्येला समाप्त होणार आहे.

हिंदू धर्मात (Hinduism) पितृ पक्षाला (Pitru Paksha 2021) विशेष असं महत्व प्राप्त आहे.

श्राद्ध म्हणजे काय?

श्राद्धाच्या वेळी आपण आपल्या पूर्वजांना जे दान देतो, त्याला 'श्राद्ध' म्हणतात. शास्त्रानुसार जे मरण पावले आहेत आणि ते सर्व या दिवसात आपल्या सूक्ष्म स्वरूपासह पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या कुटुंबांचे तर्पण स्वीकारतात.

..म्हणून केस कापण्यास मनाई आहे

पितृ पक्षात प्रत्येक कुटुंबातील मृत पालकांसाठी श्राद्ध केलं जातं. दरम्यान, पितृ पक्षात अनेक श्रद्धा प्रचलित आहेत, त्यापैकी एक म्हणजे श्राद्धात केस कापणे. यामागची धार्मिक श्रद्धा अशी आहे, की श्राद्धाच्या दिवशी केस कापणे हा एक प्रकारे सुंदर असण्याशी संबंधित आहे. हा शोकाचा काळ आहे, म्हणून केस कापण्यास मनाई केली जाते. पण, ज्योतिषांच्या मते ग्रंथांमध्ये तसा कोणताही उल्लेख नाही.

पितृपक्षात कांदा, लसूण खाणं टाळा

पितृपक्षात लसूण आणि कांदा खाणं टाळा. कारण, या गोष्टी तामसिक अन्नात समाविष्ट केल्या आहेत. त्यामुळे पितृपक्षात कांदा आणि लसूण टाळावे. या शिवाय मांस, मासे आणि अल्कोहोलचे (दारु) अजिबात सेवन करू नये. तसेच पितृपक्षात शिळे अन्नही खाऊ नये, असं म्हटलं गेलंय.

पती-पत्नीने संयम बाळगायला हवा

श्राद्धाच्या दिवसात पूर्वज आपल्या घरात असतात, असं मानलं जातं. त्यामुळे पती-पत्नीने या काळात थोडा संयम बाळगला हवा. घरात कोणत्याही प्रकारचा वादविवाद न करता शांतता ठेवायला हवी.

पितृपक्ष 2021 ची सुरुवात आणि समाप्ती

यावर्षी पितृपक्ष 20 सप्टेंबरपासून सुरु होत आहे.

शेवटचे श्राद्ध अर्थात, अमावस्या श्राद्ध 6 ऑक्टोबर रोजी असेल.

श्राद्ध विधीची वेळ

  • प्रतिपता श्राद्ध - 21 सप्टेंबर 2021 मंगळवार

  • प्रतिपदा तिथी प्रारंभ - 21 सप्टेंबर 2021 मंगळवार पहाटे 5.24 वाजता

  • प्रतिपदा तिथी समाप्ती - 21 सप्टेंबर 2021 मंगळवार पहाटे 5.51 वाजता

  • कुतुप मुहूर्त - सकाळी 11:50 वाजता ते दुपारी 12:38 वाजेपर्यंत

  • कालावधी - 49 मिनिटं

  • रौहिण मुहूर्त - दुपारी 12:38 ते 01:27 वाजेपर्यंत

  • कालावधी - 49 मिनिटं

  • अपराह्न काळ - दुपारी 1:27 ते 3:53 वाजेपर्यंत

  • कालावधी - 2 तास 26 मिनिटं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT