Pitru Paksha 2023 esakal
लाइफस्टाइल

Pitru Paksha 2023 : कावळे गेले कुणीकडे, इथे नैवेद्य शिवण्यासाठी मिळतील पाळलेले कावळे

कावळ्यांनी नैवेद्य शिवल्याशिवाय पितर शांत होत नाहीत, अशी मान्यता आहे

Pooja Karande-Kadam

Pitru Paksha 2023 : भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेनंतर पितृ पंधरवाड्याला सुरूवात झाली आहे. या पंधरा दिवसात लोक पितरांसाठी घरावर नैवेद्य ठेवतात. तो नैवेद्य कावळ्यांनी खाल्ला की तो पितरांपर्यंत पोहोचला असे समजले जाते. पण, सध्या कावळा. चिमणी असे पक्षी केवळ गोष्टींत उरले आहेत.

तुम्हीही यंदा नैवेद्य ठेऊन कावळ्यांची वाट पाहत असाल तर ही तुमच्या कामाची बातमी आहे. वाट पाहून, काव काव ओरडून कावळे येत नाहीत. त्यामुळे गायीला नैवेद्य अर्पण करावा लागतो.

या समस्येवर साताऱ्यातील एका व्यक्तीने तोडगा काढला आहे. या व्यक्तीने चक्क कावळे पाळले आहेत. आणि ज्या कुणाचे पितर नैवेद्य शिवत नाहीत. त्यांच्यासाठी पाळलेले कावळे हा एक चांगला ऑप्शन आहे.

भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेनंतर पितृपक्षाला सुरूवात होते. त्याला काठी ठिकाणी पितृ पंधरवडाही म्हणतात. पितृपक्ष २९ सप्टेंबरपासून सुरू झाला असून तो 14 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.  पितरांचे स्मरण करण्यासाठी धूप, ध्यान आणि दान अर्पण करण्याचा हा उपक्रम 14 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

या पंधरा दिवसात पितरांना जेऊ घालण्याची प्रथा आहे. आपल्या माहिती असलेल्या नसलेल्या सर्वच पितरांनी शांत होऊन आपल्याला आशिर्वाद द्यावा, यासाठी पितरांसाठी स्मशानात, घरावर नैवेद्य ठेवतात. आपल्या पितरांना आवडणारी प्रत्येक गोष्ट त्यात ठेवली जाते. आणि कावळ्यांची वाट पाहिली जाते. (Pitru Paksh 2023 )

घराजवळ असलेले कावळे तो नैवेद्य ग्रहन करतात तेव्हा पितृ शांत झाले असे म्हटले जाते. एखादा व्यक्तीचे निधन झाल्यानंतरही त्याच्या कार्याला कावळा लागतो. पण आजकाल चिमणी कावळे फक्त गोष्टीतच राहीले आहेत.

कार्याला कावळा आला नाही की, लोक गायीला जबरदस्ती नैवैद्य खाऊ घालतात. पण थेट कावळ्याने नैवेद्य शिवणे म्हणजे मेलेल्या व्यक्तीने नैवेद्य खाणे होय. त्यामुळे गायीने नैवेद्य खाऊनही लोक मनातून नाराजच असतात. अशा लोकांसाठीच साताऱ्यातील कोरेगावच्या शिरंबे गावात एका व्यक्तीने कावळे पाळले आहेत.

शिरंबे हे सधन गाव असून निसर्गसौंदर्यांने नटलेलं आहे. पण, तरीही गावात कावळा दिसत नाही. त्यामुळे लोकांना कार्य करणे अवघड बनले आहे. अशांसाठी सचिन बळीराम माने यांनी तीन कावळे पाळले आहेत.

सचिन यांच्याकडे हे कावळे कसे आले, यामागेही एक स्टोरी आहे. ती जाणून घेऊयात.  ‘‘साडेतीन वर्षांपूर्वी शेळ्या चरण्यासाठी शिवारात गेलो होतो. त्या वेळी अचानक वादळी वाऱ्यामुळे डोक्‍यावर कावळ्याचे घरटे पडले. त्यात तीन लहान कावळ्याची पिले होती. ती तडफडत पडलेली असताना त्यांना तेथे टाकून जावेसे वाटत नव्हते.

अखेर टॉवेलमधून ती तीन लहान पिल्ले मी घरी आणली आणि त्यांचा सांभाळ सुरू केला. हळहळू ती मोठी झाली अन्‌ माझ्या घरातील सदस्यच झाली. या कावळ्यांना घरात पिंजऱ्यात जखडून ठेवलेले नाही. संपूर्ण घरात त्यांचा मुक्त संचार असतो. असे माने यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

माने हे व्यवसायाने ड्रायव्हर आहेत. गावातच ते जीपचालक म्हणून काम करतात. त्यांच्या घरी पत्नी स्वाती, मुलगा, मुलगी व तीन कावळे असे मोठे कुटुंब आहे. घरात तीन कावळे असल्याने माझ्या घरावर इतर किमान दहा ते १५ कावळे दररोज बसून असतात. त्यांनाही जसे जमेल तसे मी खायला देतो, असेही माने म्हणाले.

साताऱ्यात २५ वर्ष कावळा दिसलाच नाही

साताऱ्यातील केवळ शिरंबे नाहीतर अनेक गावे अशी आहेत, ज्यांनी कावळे पाहिलेच नाहीत. होय, गेल्या ३० ते ४० वर्षात साताऱ्यातील अनेक गावकऱ्यांनी कावळ्याची काव-काव ऐकलेली नाही. तर पिंडाचा नैवेद्य गायीला भरवण्यात येतो.

गेल्या काही वर्षात ऊस पिकाची शेती वाढली आहे, आणि त्यावर होणारी औषध फवारणी यामुळे कावळे गावात दिसत नाहीयेत, असे पक्षीतज्ज्ञांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

IND vs ENG 2nd Test: W,W,W,W,W! मोहम्मद सिराज ऑन फायर, बेन स्टोक्स गांगरला; इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

SCROLL FOR NEXT