Healthy Pregnancy
Healthy Pregnancy esakal
लाइफस्टाइल

Healthy Pregnancy : तिशीत प्रेग्नेंसी प्लान करताय? प्रजननक्षमता वाढवण्यासाठी करा 'हा' उपाय

सकाळ ऑनलाईन टीम

Healthy Pregnancy Planning : बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांमध्ये स्ट्रेसचं प्रमाण वाढतंय. अशा वेळी अनेक महिलांना कंसिव करण्यात अडचणी येतात. दैनंदिन जीवनातील बऱ्याच गोष्टींचा महिलांच्या फर्टिलिटीवर परिणाम होतो. आज आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत ज्याने तुम्ही प्रेग्नेंसी बूस्ट करू शकता.

आई होणं हे प्रत्येक महिलेचं स्वप्न असतं. मात्र अनेक महिलांना त्यांचे करियर गोल सेट करता करता प्रेग्नेंसी प्लान करण्यास उशीर होतो. मात्र तुम्हाला माहितीये काय? वाढत्या वयासह तुमची फर्टिलिटी कमी होते. महिलांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास वयानुसार महिलांच्या एग्ज कॉलिटी आणि संख्या दोन्ही कमी होते.

प्रेग्नेंसी प्लान करताना ज्याप्रमाणे पुरुषांची स्पर्म कॉलिटी महत्वाची असते अगदी त्याचप्रमाणे कंसिव्ह करताना महिलांची एग्ज कॉलिटी आणि स्पर्म काउंट महत्वाचा ठरतो. अनेक महिला स्ट्रेसफुल वातावरणामुळे स्वत:कडे लक्ष देऊ शकत नाहीत. मात्र एक्सपर्टच्या मते, स्ट्रेसफुल वातावरणामुळे महिलांच्या प्रजनन क्षमतेवर त्याचा परिणाम होतो.

हे उपाय करत वाढवा फर्टिलिटी

पौष्टिक आहार घ्या - जर तुम्ही कंसिव करण्याचा प्लान करत असाल तर तुम्ही जंक फुड टाळायला हवं. ड्राय फ्रूट्स, भाज्या, कार्ब्स, प्रोटीन आणि गुड फॅट असणारे पदार्थ यांचा समावेश करून घ्या. यामुळे प्रेग्नेंसी बूस्ट होते.

स्ट्रेस घेऊ नका - अधिक स्ट्रेस घेतल्याने तुमच्या आरोग्यासह तुमच्या फर्टिलीटीवरही परिणाम होतो. ज्याचा परिणाम तुमच्या मासिक पाळीवरदेखील होतो. स्ट्रेस दूर करण्यासाठी मेडिटेशन करा.

या गोष्टी आवर्जून टाळा

प्रेग्नेंसीमध्ये महिलांना मद्यपान, सिगारेट आणि मांसाहार करू नये असा सल्ला दिला जातो. तुम्ही कंसिव्ह करताना या सगळ्या गोष्टींची सातत्याने काळजी घेतल्यास तुमचे कंसिव्हिंग चांसेस वाढतात.

रोज सेक्स करणे - स्टडीजच्या मते, दर दुसऱ्या दिवशी सेक्स करणाऱ्या जोडप्यांचे कंसिव्ह करण्याचे चांसेस सेक्स न करणाऱ्या जोडप्यांच्या तुलनेत जास्त असतात.

वेळीच प्रेग्नेंसी प्लान करा - हेल्थ एक्सपर्टच्या मते, जर तुम्हाला आई-वडिल व्हायचे असेल तर तिशीच्या आधीच प्रेग्नेंसी प्लान करा. तिशीनंतर प्रेग्नेंसी प्लान करताना स्ट्रेस लेव्हलही वाढतो. तेव्हा तिशीतच प्रेग्नेंसी प्लान करावी. या काळात शरीरातील एग्ज लेव्हल आणि कॉलिटीही चांगली असते.

डिस्क्लेमर - वरील लेख केवळ माहितीसाठी असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding: घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत, दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार; देवेंद्र फडणवीस घटनास्थळी दाखल

Maharashtra Lok Sabha Election 2024 : चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात 52.63 टक्के मतदान, शिरुर अन् पुण्यात मतदारांचा कमी प्रतिसाद

KL Rahul : हे तर पेल्यातलं वादळ... केएल अन् गोयंका वादावर लखनौच्या कोचला नेमकं काय म्हणायचंय?

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग कोसळल्याने आतापर्यंत 3 जणांना मृत्यू; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

SCROLL FOR NEXT