postcoital dysphoria (PCD) google
लाइफस्टाइल

Physical Relation : शारीरिक संबंधांनंतर मनात दाटून येणाऱ्या या भावना आहेत धोक्याची घंटा

खरंतर संभोग केल्याने आपला मूड चांगला होईल अशी अनेकांना अपेक्षा असते. पण काहीजणांची ही अपेक्षा पूर्ण होत नाही.

नमिता धुरी

मुंबई : सामान्यतः असे मानले जाते की पुरुष शारीरिक संबंध आनंद मिळवण्यासाठी करतात, परंतु नुकत्याच झालेल्या एका संशोधनात उलट परिणाम समोर आला आहे. या संशोधनाचे निष्कर्ष आश्चर्यकारक आहेत. संशोधनानुसार, शारीरिक संबंध ठेवल्यानंतर काही काळानंतर पुरुषांना वाईट वाटते.

खरं तर, जर्नल ऑफ सेक्स अँड मॅरिटल थेरपीमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, पुरुषांना स्त्रियांप्रमाणेच पोस्टकोइटल डिसफोरियाचा त्रास होऊ शकतो. PCD हा एक आजार आहे ज्यामध्ये संभोगानंतर दुःख, चिंता, चिडचिड आणि राग या भावना येतात. (postcoital dysphoria (PCD)) हेही वाचा - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान? 

खरंतर संभोग केल्याने आपला मूड चांगला होईल अशी अनेकांना अपेक्षा असते. पण काहीजणांची ही अपेक्षा पूर्ण होत नाही. त्यांना संभोग केल्यानंतर अतिशय निराश वाटू शकते. एखाद्या गोष्टीचे वाईट वाटू शकते किंवा चिडचिड होऊ शकते.

ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार, महिलांमध्ये या प्रकारची तक्रार आढळून आली आहे, परंतु या प्रकारची समस्या पुरुषांमध्येही आढळते, हे पहिल्यांदाच समोर आले आहे.

हे संशोधन ऑनलाइन सर्वेक्षणाद्वारे करण्यात आल्याचे संशोधक जोएल मॅकजकोविक यांनी सांगितले. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, अमेरिका, यूके, रशिया, न्यूझीलंड, जर्मनी आणि इतर देशांतील १,२०८ पुरुषांचा समावेश होता.

संशोधनानुसार, चाळीस टक्के लोकांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात पीसीडी जाणवल्याचे कबूल केले आहे. त्याच वेळी, २० टक्के लोकांना चार आठवड्यांत पीसीडी जाणवली.

काही जणांना संभोगानंतर लगेचच सर्व नकारात्मक भावना दाटून येतात. पण काही जणांना काही कालावधीनंतर मानसिक त्रास होऊ लागतो.

पूर्वायुष्यातील वाईट अनुभव, संभोगादरम्यान अपेक्षा पूर्ण न होणे, कामाचा ताण, इत्यादी कारणे यामागे असू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Shivaji Patil : आमदार शिवाजी पाटील गोकुळच्या पहिल्याच कुस्तीत चितपट, मंत्री हसन मुश्रीफांचा पहिला डाव यशस्वी

Mumbai: मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणांत महाराष्ट्र पहिला, बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्येही वाढ; क्रायची नोंद

Suryakumar Yadav: 'काही गोष्ट स्पष्ट करायच्यात, माझ्या दुखापतीबद्दल बोलणारे...' सूर्याने सांगितलं सत्य नेमकं काय? फॉर्मवरही भाष्य

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

SCROLL FOR NEXT