Second Hand Cars sakal
लाइफस्टाइल

झूम : सेकंड हँड कारचे चेकपॉइंट्स...

वापरलेल्या वाहनांची (सेकंड हँड) बाजारपेठ भारतात अफाट होत चालली आहे. नवीन कारप्रमाणेच येथेही ग्राहकांचा संभ्रम होतो.

प्रणीत पवार

वापरलेल्या वाहनांची (सेकंड हँड) बाजारपेठ भारतात अफाट होत चालली आहे. नवीन कारप्रमाणेच येथेही ग्राहकांचा संभ्रम होतो. काही बाबींकडे दुर्लक्ष केल्यास ही सेकंड हँड वाहने परवडणारी असतात; परंतु अशी वाहने खरेदी करण्यापूर्वी काही ‘चेकपॉइंट्स’ अर्थात काही बाबी तपासायच्या असतात, याबाबत सविस्तर...

१) रिसर्च

वाहन खरेदी करण्यापूर्वी बजेट ठरवणे गरजेचे आहे. ते ठरवल्यानंतर वाहनाची श्रेणी (हॅचबॅक, सेदान, एसयूव्ही, एमपीव्ही) निश्चित करावी. बजेट २-४ लाख असेल, तर हॅचबॅक किंवा जास्तीत जास्त सेदान प्रकारातील कार येऊ शकते. त्यामुळे बजेटनुसार कारचा प्रकार ठरवावा. बरेच जण परिचयाची व्यक्ती किंवा त्रयस्थांकडून कार खरेदी करतात; परंतु डीलर्सकडून एखादी कार खरेदी करायची असते तेव्हा ऑनलाईन सर्च केले जाते. हल्ली विविध कंपन्या अशा वापरलेल्या कारबाबत ऑनलाईन माहिती देत असतात.

कुटुंबातील व्यक्तींच्या संख्येनुसार कार निश्चित केल्यानंतर ती किती किलोमीटर धावली आहे, हे पाहावे. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार ५ ते ६ वर्षे वापरलेल्या आणि ५० ते ६० हजार किलोमीटर धावलेल्या कार खरेदी करणे सोयीस्कर असते. त्याहून अधिक असेल, तर ती कार नंतर नादुरुस्त होण्याची शक्यता असते. काही कारमध्ये मीटर टेम्परिंग (फेरफार) केलेले असते. त्यासाठी कारची ‘सर्व्हिस हिस्ट्री’ तपासावी.

२) इन्स्पेक्शन

सेकंड हँड कार खरेदी करण्यापूर्वी तिचे सर्वांगाने इन्स्पेक्शन करणे आवश्यक आहे. एखादी ओळखीची तज्ज्ञ व्यक्ती किंवा थेट गॅरेज चालकालाच कारतपासणीसाठी सोबत घेऊन जाऊ शकतो. आताच्या आधुनिक काळात इन्स्पेक्शन करणाऱ्या खासगी कंपन्याही कार्यरत आहेत. त्यासाठी ठरावीक शुल्क आकारले जाते. ते भरल्यानंतर संबंधित कंपनीचा मेकॅनिक कारचे इन्स्पेक्शन करतो. त्यानंतर कारचा संपूर्ण रिपोर्ट दिला जातो.

इन्स्पेक्शनसाठी आपण स्वत: गेलो, तरी काही गोष्टींची खातरजमा करता येते. यात प्रथम ‘बॉडीलाईन’ तथा बाह्यभाग तपासावा. त्यात कॉर्नरला (पुढील-पाठीमागील बम्पर, बोनेट) किमान स्क्रॅच असलेले चालून जातात; परंतु डेंट्स असतील तर तपासून घ्यावेत. दरवाजा, खिडकी, बोनेटचे ‘शटलाईन’ म्हणजेच फट एका सरळ रेषेत आहेत की नाही, हे तपासावे. यात टायरचे थ्रेडही पाहावे, त्यांची झीज ३ मिलिमीटरपेक्षा जास्त झाली असल्यास ते भविष्यात आपल्याला बदलावे लागणार, हे किंमत निश्चित करताना ध्यानात ठेवावे.

कारचे चारही सस्पेन्शन तपासताना त्यातून ऑईल लिकेज होते का, हे पाहावे (होत नसल्यास उत्तम). कारचे बोनेट उघडून पाहिल्यानंतर ऑईल लिकेज, बॅटरीचे टर्मिनल्स, मेटल स्ट्रक्चर आदी गोष्टींबाबत तपासणी करावी. मेटल स्ट्रक्चरमध्ये कुठे वेल्डिंग किंवा डेंट्स दिसल्यास कारचा अपघात झालेला आहे, असे समजावे. बेल्ट्स, त्यांचे बेअरिंग तपासावे. दरवाजे तपासताना रबर (डोअर बेडिंग) पाहावे. तेथे कुठे वेल्डिंग असल्यास कार अपघातग्रस्त आहे, असे समजावे. कारच्या इंटिरिअरमध्ये सीट्स, डॅशबोर्ड, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्स, हेडलँप्स (अप्पर/लोअर बीम्स), टर्न इंडिकेटर, हॅजर्ड लँप एसी व्हेंट्स तपासावे. त्यानंतर इग्निशन चालू करून कारच्या इंजिनचा आवाज तपासावा.

३) टेस्ट ड्राइव्ह

कारची टेस्ट ड्राइव्ह ठरावीक वेगमर्यादेत घ्यावी. सस्पेन्शनमधील आवाज, स्टेअरिंगची हाताळणी, तिची अलाइनमेंट आणि महत्त्वाचे म्हणजे कम्फर्ट लेवल तथा कार किती आरामदायी आहे आदी गोष्टी पडताळून पहाव्यात. कारचे काही की-पॉइंट्सही तपासावे, त्यात इन्शुरन्स, बॅटरीचे आयुर्मान, किल्ली ओरिजिनल आहे का हे तपासावे. कारची वॉरंटीही असते. आपण ओळखीच्या व्यक्तीकडून घेतल्यास ती मिळत नाही; परंतु एखाद्या डीलरकडून घेतल्यास वॉरंटी मिळते. यात फक्त कोणकोणत्या बाबींवर वॉरंटी आहे, हे पडताळणे आवश्यक असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT