Accident
Accident Sakal
लाइफस्टाइल

झूम : प्रवास सुरक्षित बनण्यासाठी...

प्रणीत पवार

रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी किंवा त्यापासून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी कारमधील सुरक्षात्मक वैशिष्ट्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी किंवा त्यापासून होणारी जीवितहानी टाळण्यासाठी कारमधील सुरक्षात्मक वैशिष्ट्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. यामध्ये एअरबॅग, एबीएस, ईबीडी, सेफ्टी बेल्ट, रिव्हर्स सेन्सर, कॅमेरा, स्पीड अलर्ट आदी वैशिष्ट्यांचा समावेश आहे. जेव्हा एखाद्या कारची सुरक्षात्मक चाचणी होते तेव्हा याच सुरक्षात्मक वैशिष्ट्यांच्या आधारावर रेटिंग दिले जाते. ही सुरक्षात्मक रेटिंग प्रौढ आणि लहान मुलांसाठी वेगवेगळी असते. भारतात साधारण २०१४-१५ पासून या सेफ्टी रेटिंगबाबत वाहनप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली.

वाढत्या रस्ते अपघातांच्या पार्श्वभूमीवर कारमधील सेफ्टी फीचर्सला हल्ली अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. कार कंपन्यांमध्येही याबाबत चढाओढ पहायला मिळते. याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा किमतीत सेफ्टी फीचर्सचे परिपूर्ण पॅकेज देण्याचा प्रयत्न कार कंपन्यांकडून होत आहे. भारतातील बहुतांश कारची सुरक्षात्मक चाचणी ‘ग्लोबल न्यू कार ॲसेसमेंट प्रोग्राम’द्वारे (एनसीएपी) केली जाते आणि त्यानुसार रेटिंग दिले जाते. याबाबत माध्यमे तसेच कार कंपन्यांकडून जनजागृती केली जात असल्याने ग्राहकही सजग झाले आहेत. परिणामी एनसीएपीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या कार खरेदीकडेच ओढा वाढला आहे.

सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे कारमधील कोणतेही सेफ्टी फीचर्स अपघातादरम्यान जीवाची १०० टक्के खात्री देत नाहीत. या सेफ्टी फीचर्सद्वारे केवळ अपघाताची शक्यता किंवा तीव्रता पूर्णपणे कमी होऊ शकते. म्हणूनच कुठेही आणि कुठलेही वाहन चालवताना, वाहतूक नियमांचे पालन करणे कधीही हुशारीचे असते. कारमधील सेफ्टी फीचर्स हे दोन प्रकारचे असतात. ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह, असे हे दोन प्रकार.

ॲक्टिव्ह फीचर्स

अपघात होण्यापूर्वी वापरता येणाऱ्या फीचर्सचा ॲक्टिव्ह फीचर्समध्ये समावेश होतो. अशा फीचर्समुळे संभाव्य अपघातात होणारी हानी टळली जाते. यामध्ये एबीएस, ईबीडी, ब्रेक असिस्ट, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टिम, स्पीड अलर्ट, फॉग लॅम्प, साईड इंडिकेटर, कारच्या आरशांवरील इंडिकेटर, ब्रेक लाईट आदी ॲक्टिव्ह फीचर्स परिस्थितीनुरूप उपयोगात येतात.

पॅसिव्ह फीचर्स

एखादा अपघात झाल्यानंतर वापरात येणाऱ्या फीचर्सचा पॅसिव्ह फीचर्समध्ये समावेश होतो. अपघातानंतर होणारी हानी किंवा नुकसानाची तीव्रता अशा फीचर्समुळे कमी होते. यामध्ये एअर बॅग, सीट बेल्ट, क्रंपल झोन, कोलॅप्सिबल स्टेअरिंग आदी फीचर्स उपयोगात येतात आणि संभाव्य जीवितहानी टळता येते.

कारच्या विविध व्हेरिएंटनुसार कमी अधिक प्रमाणात सेफ्टी फीचर्स दिलेले असतात. सेफ्टी रेटिंग देण्यासाठी कारची सर्व प्रकारची क्रॅश टेस्ट होते. कारमध्ये चार ते पाच डमी प्रवासी बसवले जातात. पाठीमागील सीटवर लहान मुलाची डमी असते.

त्याद्वारे चाईल्ड सेफ्टी रेटिंगही दिले जाते. चाचणीदरम्यान कारला एका मजबूत वस्तूला धडकवले जाते. या क्रॅश टेस्टनंतर कारमधीस एअरबॅग उघडली की नाही, कारमध्ये बसवलेले डमी प्रवासी किती डॅमेज झाले, इतर सेफ्टी फीचर्सने किती काम केले या सर्वांच्या आधारावर रेटिंग दिले जाते. कार क्रॅश टेस्टदरम्यान प्रौढ आणि लहान मुलांच्या अनुषंगाने सेफ्टी रेटिंग दिले जाते.

ॲडल्ट ऑक्युपंट प्रोटेक्शन (एओपी)

याद्वारे रेटिंग देताना कार समोरून ठोकल्यानंतर पुढे बसलेला प्रवासी आणि चालक किती सुरक्षित आहे, हे पाहिले जाते.

चाईल्ड ऑक्युपंट प्रोटेक्शन (सीओपी)

याद्वारे रेटिंग देताना समोर आणि बाजूनेही ठोकर दिल्यानंतर पाठीमागील सीटवर बसलेली लहान मुले किती सुरक्षित आहे, हे तपासले जाते.

सद्यःस्थितीत सर्वाधिक रेटिंग असलेल्या कार

क्र. कार प्रौढ बालक

१. टाटा पंच ५ स्टार ४ स्टार

२. महिंद्रा एक्सयूव्ही ३०० ५ स्टार ४ स्टार

३. टाटा अल्ट्रोज ५ स्टार ३ स्टार

४. टाटा नेक्सॉन ५ स्टार ३ स्टार

५. महिंद्रा एक्सयूव्ही ७०० ५ स्टार ४ स्टार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

Mouni Roy: एका दिवसात तीस गोळ्या अन् इंजेक्शन्स; तीन महिने अंथरुणाला खिळून होती मौनी रॉय, अशी झाली होती अवस्था

PBKS vs CSK : चेन्नई संघासमोर गोलंदाजीचे प्रश्नचिन्ह; मागील सामन्यात पराभव झालेल्या पंजाबविरुद्ध पुन्हा सामना

Latest Marathi News Live Update : पूँचमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; गोळीबारात 1 जवान शहीद, 4 जखमी

SCROLL FOR NEXT