Drinking Milk Google
लाइफस्टाइल

pregnancy diet: प्रेग्नंसी काळात चुकूनही पिऊ नका 'हे' ड्रींक्स

गरोदरपणात 'हे' ड्रींक्स घेत असाल तर थांबा!

शर्वरी जोशी

प्रेग्नंसीच्या काळात प्रत्येक स्त्रीने स्वत:ची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण, या काळात स्त्रिया सेवन करत असलेल्या प्रत्येक पदार्थाचा परिणाम पोटातील बाळाच्या वाढीवर होत असतो. त्यामुळे या दिवसांमध्ये स्त्रियांनी जास्तीत जास्त सकस व पौष्टिक पदार्थ खावेत असाच सल्ला दिला जातो. परंतु, या काळात नेमके कोणते पदार्थ खावेत वा खाऊ नये याची पुरेशी माहिती स्त्रियांना नसते. म्हणूनच, गरोदरपणात कोणत्या पेयांचं सेवन करु नये ते पाहुयात. (pregnancy diet drinks you should avoid during pregnancy)

१. दुर्वांचा रस -

दुर्वांच्या रसाचे अनेक शारीरिक फायदे आहेत. मात्र, या रसाचं गर्भवती स्त्रियांनी चुकूनही सेवन करु नये. दुर्वांच्या रसामध्ये मोठ्या प्रमाणावर मायक्रोब्स असतात ज्यामुळे बाळाला त्रास होऊ शकतो.

२. डाएट सोडा -

डाएट सोड्यामध्ये कॅफीन व सोडा यांचं प्रमाण जास्त असतं. सोबतच त्यात साखरही असतं. ज्यामुळे बाळावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

३. अल्कोहोल -

गर्भावस्थेमध्ये अल्कोहोलचं सेवन केल्यामुळे बाळाच्या मेंदूला इजा पोहोचू शकते. तसंच त्याच्यात जन्मजात काही व्यंगदेखील उद्भवू शकतं.

४. ग्रीन टी -

अनेक जण चहा-कॉफीऐवजी ग्रीन टी पिण्यावर अधिक भर देतात. परंतु, यामुळेदेखील बाळाला त्रास होऊ शकतो. ग्रीन टीमध्ये असलेलं अँटी ऑक्सिडेंट्स शरीरासाठी कितीही फायदेशीर असले तरीदेखील ते बाळासाठी हानिकारक असतात.

५. कॉफी -

कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅफीन असतं. ज्यामुळे झोप जास्त येते व अनेकदा तणदेखील येतो. त्यामुळे गरोदर स्त्रियांनी कॉफीचं सेवनही टाळावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Samman Nidhi : प्रतिक्षा संपली ! देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी जमा होणार २००० रुपये

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

Amravati:'पोटातल्या बाळासह गर्भवतीचा आणि इतर २ बालकांचा मृत्यू'; उपजिल्हा रुग्णालयातली धक्कादायक घटना..

Latest Marathi Breaking News : परंडा नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेचा अर्ज दाखल; तानाजी सावंत उपस्थित

Kolhapur Weather: कोल्हापुरात मध्यरात्री तापमान १४ अंश सेल्सिअसवर! दाट धुक्यात हरवले शहर, नागरिकांनी पेटवल्या शेकोट्या

SCROLL FOR NEXT