लाइफस्टाइल

८ महिन्यांच्या गर्भवतीने पटकावलं सुवर्णपदक; पाहा Video

शर्वरी जोशी

आई होणं हा जगातला सगळ्यात सुंदर क्षण आहे. गरोदरपणा स्त्री ही दोन जीवांची असते. स्त्रिच्या गर्भात एक लहान बाळ आकार घेत असतं. त्यामुळे या काळात घरातील प्रत्येक व्यक्ती स्त्रियांची विशेष काळजी घेतात. चालतांना, एखादी कृती करतांना प्रत्येक वेळी तिला सावकाश आणि हळूवार पावलं टाकण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, याच गरोदरपणाच्या काळात कधी कोणत्या स्त्रीने कराटे किंवा तायक्वांडो खेळल्याचं ऐकलं आहे का? नायजेरियामधील एका स्त्रीने चक्क गरोदरपणा तायक्वांडो स्पर्धेत सहभागी झाली असून त्यात तिने सुवर्णपदकही पटकावलं आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या महिलेची जोरदार चर्चा रंगली आहे.

नायजेरिया येथे राहणाऱ्या Aminat Idrees ही महिला आठ महिन्यांची गर्भवती असतांना तिने तायक्वांडो स्पर्धेत सहभाग घेतला होता.  इतकंच नाही तर तिने Mixed Poomsae या कॅटेगरीत सुवर्णपदकही पटकावलं.  नॅशनल स्पोर्ट फेस्टिव्हलने त्यांच्या ट्विटर पेजवर Aminat Idrees चा एक व्हिडीओ शेअर करत याविषयी माहिती दिली. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.

"प्रेग्नंसीपूर्वीच मी या स्पर्धेसाठी तयारी सुरु केली होती. त्यामुळे मी गरोदर असल्याचं लक्षात येताच आता मला या स्पर्धेत सहभागी होता येईल की नाही हा मोठा प्रश्न माझ्या समोर उभा होता. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याने मी या स्पर्धेत भाग घेऊ शकले", असं Aminat Idrees ने एका मुलाखतीत सांगितलं.

दरम्यान, सुवर्णपदकासह Aminat Idrees ही अन्य काही गटांमध्येही विजयी झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तिची तुफान चर्चा रंगली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT