Vastu Tips for Pregnant Women esakal
लाइफस्टाइल

Vastu Tips for Pregnant Women: गर्भवती महिलेची रुम नेमकी कशी असावी?

गर्भवती महिलेची रुम सेट करतांना या गोष्टी ठेवा निट लक्षात.

सकाळ डिजिटल टीम

Vastu Tips for Pregnant Women: असे म्हटले जाते की गर्भवती महिलेच्या आजूबाजूच्या वातावरणाचा गर्भातील बाळावर परिणाम होत असतो. वास्तूनुसार, गर्भवती स्त्रीच्या रुममध्ये ठेवलेल्या वस्तूंचा देखील पोटांतील बाळावर परिणाम होतो.

चला तर मग जाणून घेऊया वास्तुनुसार गर्भवती महिलेची रुम कशी असावी ?

आई होणे ही भावना प्रत्येक बाईसाठी खूप खास असते. या दरम्यान गर्भवती महिलेने आपली स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास योग्य प्रकार होणे फार गरजेचे असते. वास्तूनुसार, गर्भवती महिलेच्या आजूबाजूच्या गोष्टीचा आपोआप परिणाम पोटातील बाळावर होत असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत गर्भवती महिलेने अशाच गोष्टी आपल्या आजूबाजूला ठेवाव्यात, ज्याचा पोटातील बाळावर सकारात्मक परिणाम होईल.

Vastu Tips for Pregnant Women

गर्भवती महिलेने जर का असे केल्याने तर जन्माला येणारे बाळ हे निरोगी, सुसंस्कृत आणि आनंदी होईल. चला तर मग आज जाणून घेऊया वास्तूनुसार गर्भवती महिलेची रुम कशी असावी.

1) रुममध्ये हसणाऱ्या बाळाचा फोटो लावावा. गर्भवती महिलेने तिच्या खोलीत हसत असलेल्या बाळाचे चित्र लावावे. जिथे तुमची नजर सतत पडते अशा ठिकाणी हा फोटो ठेवा. या फोटोकडे पाहून गर्भवती महिलेलां समाधान मिळू शकतं आणि त्यामुळे ती आनंदी राहू शकते.

2) बाळकृष्णाची मुर्ती रुममध्ये ठेवावी. गर्भवती महिलेने आपल्या खोलीत बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी. तसेच, खोलीच्या अशा जागी ठेवा जिथे सकाळी उठल्याबरोबर स्त्रीचे लक्ष जाईल. असे केल्याने स्त्रीचे मन प्रसन्न राहते आणि त्याचा पोटातील बाळावर चांगला परिणाम होतो.

3) तांब्याची एखादी वस्तू रुममध्ये ठेवावी. गर्भवती महिला तांब्यापासून बनविलेली एखादी वस्तू रुममध्ये ठेवावी. असे म्हणतात की तांब्याच्या वस्तूमुळे रुममध्ये सकारात्मक ऊर्जा येते. यासोबतच गरोदर स्त्री आणि पोटातील बाळाचे वाईट नजरेपासून रक्षण होते

4) जास्तीत जास्त शुभ वस्तू रुममध्ये ठेवाव्या. तुम्ही गर्भवती महिलेच्या खोलीत भगवान श्रीकृष्णाची बासरी आणि शंख देखील ठेवू शकता. असे केल्याने पोटातील बाळ शांत आणि आनंदी होते.

5) पती-पत्नीचा फोटो रुममध्ये असा ठेवावा. वास्तुशास्त्रानुसार गरोदर महिलेच्या खोलीत पती-पत्नीचे हसतमुख फोटोही लावावेत. असे केल्याने बाळ त्याच्या आई-वडिलांच्या खूप जवळ राहते. तसेच, गर्भवती महिलेला नेहमीच सकारात्मक वाटते आणि जन्माला येणारे मूल देखील निरोगी असते.

6) या गोष्टींपासून दूर राहा.गरोदर महिलेच्या खोलीत चाकू-सुरी कधीही ठेवू नका.भितीदायक चित्रे किंवा वस्तू चुकूनही गर्भवती महिलेच्या खोलीत ठेवू नका. सोबतच गरोदर स्त्रीने सुई-धाग्याचे कामही करू नये, याचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो, अशी श्रद्धा आहे.

7) गर्भवती महिलेने सकारात्मक पुस्तके वाचावीत. तुम्ही गर्भवती महिलेच्या खोलीत रामायण किंवा श्रीमद भागवत पुराण देखील ठेवू शकता. तसेच रोज वाचल्याने बाळावर त्याचा शुभ प्रभाव पडतो. ते मूलही खूप संस्कारी आहे. असे मानले जाते की या ग्रंथाचे दररोज वाचन केल्याने मूल देवाच्या देखरेखीखाली राहते.

8) गरोदरपणात इतर वास्तु उपाय करावेत. गरोदरपणात नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी पिवळ्या तांदळाच्या लहान लहान राशी रुममध्ये करुन ठेवाव्या. ज्योतिष शास्त्रामध्ये पिवळा तांदूळ मंगळाचा सूचक मानला जातो, असे केल्याने मुलावर आणि आईवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडत नाही.

9) जेव्हा गर्भवती स्त्रियांच्या रुमचा विचार केला जातो, तेव्हा स्त्रियांच्या खोलीचा रंग गुलाबी असेल तर ते खूप चांगले आहे. गुलाबी रंग हा आनंदाचे प्रतीक मानला जातो. विशेषतः स्त्रियांच्या मनाला भुरळ घालते. गर्भवती महिलेच्या रुममध्ये हवा खेळती असावी आणि त्यात भरपूर सूर्यप्रकाश देखील असावा त्यामुळे ती रुमही सकारात्मकतेने भरलेली राहते.

10) मोराच्या पंखाचा संबंध भगवान श्रीकृष्णाशी आहे. अशा परिस्थितीत घराच्या मंदिरात किंवा गरोदर महिलेच्या खोलीत मोराची पिसे ठेवणे आई आणि बाळ दोघांसाठी चांगले मानले जाते. गरोदरपणात महिला ज्या रुममध्ये झोपते त्या खोलीच्या पलंगाखाली तुटलेल्या आणि जुन्या वस्तू ठेवू नयेत. तसेच, गर्भवती महिलेच्या खोलीत पुर्वजांचा फोटो नसावा हे लक्षात ठेवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : राम मंदिर देणगीतील अफरातफरीच्या प्रकरणात दोन गुजराती लोक विक्री करण्यात मग्न - काँग्रेस नेते परगट सिंग

SCROLL FOR NEXT