Promise Day 2024 esakal
लाइफस्टाइल

Promise Day 2024 :'प्रॉमिस डे' निमित्त जोडीदाराला 'हे' खास वचन देऊन, तुमचे नाते करा घट्ट

फेब्रुवारी महिन्याला ‘प्रेमाचा महिना’ म्हणून ही ओळखले जाते. फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात प्रेमाचा हा व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. या वीकमध्ये विविध प्रकारचे दिवस साजरे केले जातात.

Monika Lonkar –Kumbhar

Promise Day 2024 : फेब्रुवारी महिन्याला ‘प्रेमाचा महिना’ म्हणून ही ओळखले जाते. फेब्रुवारी महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात प्रेमाचा हा व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो. या वीकमध्ये विविध प्रकारचे दिवस साजरे केले जातात. रोझ डे, चॉकलेट डे, प्रपोझ डे, टेडी डे इत्यादी अनेक प्रकारचे दिवस सेलिब्रेट केले जातात. त्यानंतर, १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो.

आज या व्हॅलेंटाईन वीकपैकी एक असलेला ‘प्रॉमिस डे’ सर्वत्र साजरा केला जाणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला किंवा जोडीदाराला प्रेमाची वचने देऊ शकता. अशी वचने ज्यामुळे तुमच्या दोघांचे नाते घट्ट होण्यास मदत होईल. आज ‘प्रॉमिस डे’ निमित्त आम्ही तुम्हाला काही वचनांबद्दल सांगणार आहोत. ज्यामुळे, प्रेमाचे बंधन आणखी घट्ट होईल.

जसे आहात तसे एकमेकांना स्विकारा

आजच्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा प्रिय व्यक्तीला असे वचन द्या की, ते जसे आहात तसे तुम्ही त्यांना स्विकारले आहे. तसेच, तुम्ही आयुष्यभर त्यांच्यावर प्रेम करणार आहात. हे वचन तुम्ही एकमेकांना देऊन तुमचे नाते आणखी घट्ट करू शकता.

नात्यासाठी किंवा स्वत:च्या फायद्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न कधीच करणार नाही. अशी ग्वाही तुम्ही जोडीदाराला देऊ शकता. नात्यामध्ये दोघांनी ही एकमेकांना जसे आहात तसे स्विकारणे हे फार महत्वाचे आहे. त्यामुळे, हे वचन तुम्ही एकमेकांना नक्कीच देऊ शकता आणि त्याचे पालन करू शकता.

एकमेकांची काळजी घ्या

प्रेमाच्या नात्यामध्ये प्रत्येक जोडीदाराची हीच अपेक्षा असते की, माझ्या जोडीदाराने माझी खूप काळजी घ्यावी. ही अपेक्षा नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी या दोघांची देखील असते. त्यामुळे, आजच्या दिवशी तुम्ही हे वचन तुमच्या जोडीदाराला द्या की, तुम्ही जन्मभर त्यांची काळजी घ्याल आणि त्यांची चांगल्या प्रकारे देखभाल कराल. तसेच, त्यांच्यावर कायम असेच प्रेम करत रहाल.

एकमेकांना नेहमी साथ द्या

नेहमी एकमेकांना साथ देण्याचे वचन तुम्ही एकमेकांना द्या. कोणतीही वाईट परिस्थिती जरी आली तरी तुम्ही डगमगणार नाही, आणि एकमेकांची साथ सोडणार नाही. असे वचन तुम्ही जोडीदाराला द्या.

शिवाय, कोणत्याही परिस्थितीमध्ये जोडीदाराला तुमची जेव्हा गरज पडेल, तेव्हा तुम्ही एकमेकांसाठी हजर असाल आणि एकमेकांना पाठिंबा द्याल. असे वचन तुम्ही जोडीदाराला देऊन तुमचे नाते आणखी घट्ट करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज

Destitute Women: साेलापूर जिल्ह्यात जानेवारीपासून वाढल्या ५१४६ निराधार महिला; लाभाची माहिती आता मिळणार क्यूआर कोडवर

Aundh Traffic : औंधमधील कोंडी फोडण्यासाठी उपाययोजना करणार : मनोज पाटील

Hinjewadi IT Park : हिंजवडीतील प्रश्‍नांसाठी व्यासपीठ; विभागीय आयुक्त स्तरावर दर १५ दिवसांनी कामांचा घेणार आढावा

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ यांचे राजीनाम्यावर पुन्हा वक्तव्य, जिल्हा बँकेच्या नवीन अध्यक्षाबाबत उत्सुकता; सतेज पाटील ठरणार सूत्रधार

SCROLL FOR NEXT