Property Knowledge  sakal
लाइफस्टाइल

Property Knowledge : प्रॉपर्टीवर मुली-सुनेला मिळतो हा हक्क; कायदा काय सांगतो, जाणून घ्या

संविधानाने स्त्री पुरुष समान हक्क प्रदान केले आहे. एवढंच काय तर संपत्तीमध्ये सुद्धा स्त्रिला समान हक्क आहे.

सकाळ डिजिटल टीम

Property Knowledge : स्त्रियांना प्रत्येक गोष्टींवर पुरुषांसारखा समान अधिकार असतो. स्त्री जरी तिच्या आयुष्यात कधी मुलगी, कधी पत्नी, कधी सुन अशा वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारत घर सांभाळत असली तरी आजची स्त्री घर सांभाळूनही आपल्या पायावर उभी आहे. स्त्रिने प्रत्येक क्षेत्रात स्वत:ला सिद्ध केले आहे. संविधानाने स्त्री पुरुष समान हक्क प्रदान केले आहे. एवढंच काय तर संपत्तीमध्ये सुद्धा स्त्रिला समान हक्क आहे.

मुलगी आणि सुनेचा वडिल आणि सासऱ्यांच्या प्रॉपर्टीवर किती हक्क असतो, तुम्हाला माहिती आहे का?

हिन्दू उत्तराधिकार (संशोधन) अधिनियम, २००५  नुसार मुलींना संपत्तीचा समान अधिकार देण्यात आलाय तर सुनेला बहू प्रॉपर्टीमध्ये आपल्या नवऱ्याच्या शेअरद्वारा प्रॉपर्टीवर हक्क मिळतो. मुलींना संपत्तीमध्ये समान अधिकार दिले आहेत तर सुनेला मात्र ठराविक अधिकार आहे. (Property Knowledge Property Rights of Daughter and Daughter in law)


मुलींचा वडिलांच्या संपत्तीत हक्क

प्रत्येक कुटूंबात मुलीचा आईवडिलांच्या प्रॉपर्टीवर समान हक्क असतो. मुलगी विवाहित असो की विधवा किंवा घटस्फोटीत तरीसुद्धा ती आई वडिलांच्या घरी राहण्याचा हक्क मागू शकते. एवढंच काय तर प्रॉपर्टीमधील संपत्तीवर मुलीचा पुर्ण अधिकारही असू असतो.

जर वडिलांनी वारसपत्रात मुलीचं नाव लिहिले नसेल तर तिला संपत्तीचा अधिकार मिळत नाही पण वडिलांचा वारसपत्र न लिहताच मृत्यू झाला असेल तर तिला तिच्या भावंडासारखा संपत्तीत समान अधिकार मिळतो.

सुनेचा सासरच्या संपत्तीत हक्क

हिन्दू उत्तराधिकार (संशोधन) अधिनियम, २००५ नुसार सुनेला संपत्तीमध्ये खूप कमी अधिकार मिळाले आहे. सासू सासऱ्यांच्या संपत्तीत सुनेला कोणताही अधिकार नसतो. ती फक्त नवऱ्याच्या संपत्तीवर अधिकार मिळवण्याचा दावा करू शकते.

सासू सासऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवर सुनेचा अधिकार नसतो. तो हक्क तिच्या नवऱ्याचा असतो पण सासू सासऱ्यांच्या वारस पत्रात जर कुणाचेही नाव नसेल आणि मुलाचा मृत्यू झाला असेल तर त्या संपत्तीवर मुलाची बायको म्हणून सुनेचा हक्क असतो.

मुलाच्या मृत्यूनंतर सासू सासऱ्यांच्या प्रॉपर्टीवर सुनेचा अधिकार

नवऱ्याच्या मृत्यूनंतर सुनेला समान अधिकार मिळतो. नवऱ्याच्या निधनानंतर सासू सासरे सुनेला घर किंवा संपत्तीपासून दूर करू शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT