Drink Protein Shake 
लाइफस्टाइल

Protein Shake पिताय! त्यामुळे होणारे ४ परिणाम जाणून घ्या

तंदूरूस्त राहण्यासाठी मर्यादेत प्रोटीन शेक पिणे चांगले मानले जाते

सकाळ डिजिटल टीम

शरीरासाठी प्रथिनयुक्त पदार्थ खाणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. शरीरातील स्नायूंच्या विकासासाठी आणि आरोग्यासाठी (Health) प्रथिनांचे सेवन गरजेचे आहे. शरीराला योग्य प्रमाणात प्रथिनं (Protein) मिळावीत यासाठी आहारात आपण अनेक गोष्टींचा समावेश करतो. फिटनेस फ्रिक लोकं यासाठी प्रोटीन शेक आवर्जून पितात. पण तंदूरूस्त राहण्यासाठी मर्यादेत प्रोटीन शेक पिणे चांगले मानले जाते. पण, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. तुम्ही जर अतिप्रमाणात प्रोटीन शेक पित असाल तर तुमच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे डाएटेशियनच्या सल्ल्यानुसारच प्रोटीन शेक प्यावा.

असे होतात परिणाम

१) यकृत- यकृत निरोगी ठेवण्यासाठी, मर्यादित प्रमाणात प्रोटीन शेक प्या. कारण प्रोटीन शेक जास्त प्रमाणात प्यायल्याने यकृतात जळजळ होऊ शकते. तसेच गंभीर आजाराचा धोका वाढण्याची शक्यता असते.

२) डिहायड्रेशन- जर तुम्ही जास्त प्रथिनंयुक्त आहार घेत असाल, तर तुम्ही जास्तीतजास्त पाणी प्यावे, कारण जास्त प्रमाणात प्रोटीन शेक घेतल्याने डिहायड्रेशन होऊ शकते.

३) त्वचा- प्रथिने शरीरातील हार्मोन्सचे उत्पादन वाढवतात. त्वचा निरोगी ठेवायची असेल तर, प्रोटीन शेक मर्यादित प्रमाणात प्या. तो जास्त प्यायल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

४) कमी रक्तदाब - जर तुम्ही कमी रक्तदाबामुळे त्रस्त असाल तर कमी प्रमाणात प्रोटीन शेक पिणे चांगले. कारण जास्त प्रमाणात प्रोटीन शेक प्यायल्याने तुमचा रक्तदाब मोठ्या प्रमाणात कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT