
व्यायामानंतर थंड की गरम कोणते पाणी प्यावे? शास्त्र सांगतं...
व्यायामानंतर एक ग्लास थंड पाणी पिण्याची इच्छा अनेकांना होते. तसे पाणी पिणारे अनेक लोकं आहेत. पण तुम्ही व्यायामासाठी (Exercise)जी तासभर मेहनत घेतलीत ती वाया जाऊ शकते असं तुम्हाला वाटतं का? पण नेमकं काय योग्य? व्यायामानंतर गरम पाणी (Water)प्यायचं का? काही संशोधनानुसार व्यायामानंतर गार पाणी प्यायल्याने तुमच्या अंतर्गत अवयवांना (Body) धक्का लागतो. तसेच व्यायामानंतर थंड पाणी प्यायल्याने तुम्हाला जास्त थकवा येऊ शकते. तसेच पेटके येऊ शकतात. त्यामुळे कोणतं पाणी योग्य ते जाणून घ्या!
हेही वाचा: Water Weight म्हणजे काय? यामुळे वाढलेलं वजन असं करा कमी

WATER
वर्कआऊटनंतर गार पाणी प्यावे का? ( Should Drink Cold Water After Workout Or Not?)
1) तुम्हाला जास्त उर्जा लावावी लागेल- काही लोकांच्या मते, थंड पाण्याला शरीराच्या तापमानाच्या पातळीवर आणण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त उर्जा वापरावी लागेल. थंड पाणी प्यायल्यानंतर तुम्ही वर्कआऊट केलेत तर लगेच थकवा जाणवेल. हा थकवा आल्याने कदाचित तुम्हाला तुम्ही जास्त व्यायाम केलाय असं वाटेल. पण ते चुकीचं आहे. तर, गरम पाणी खोलीच्या तापमानाऐवढं गरम असेल. ते प्यायल्याने तुमचे वजन कमी होईल.
हेही वाचा: सकाळ, संध्याकाळच्या व्यायामाचा शरीरावर वेगवेगळा परिणाम! अभ्यासात झाले स्पष्ट
2) हायड्रेटेड राहा- वर्कआउट करण्यापूर्वी, त्यादरम्यान आणि नंतर स्वत:ला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, असे तज्ज्ञ सांगतात. पण, एक ग्लास थंड पाणी प्यावे की गरम पाणी प्यावे हा संभ्रम अजूनही कायम आहे. अमेरिकन कॉलेज ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनच्या 1996 च्या पोझिशन पेपरमध्ये थंड पाण्याची शिफारस केली आहे. कारण व्यायाम केल्यानंतर तुम्ही जे पाणी प्याल ते ते खओलीच्या तापामानापेक्षा थंड असले पाहिजे. क्रिडा आहारतज्ज्ञ ब्रूक शँट्झ यांच्या मते, हायड्रेटेड राहण्यामुळे तुमच्या हृदयाची गती कमी होईल तसेच शरीराचे तापमान कमी होईल. तुम्हाला थकवा जाणवणार नाही आणि तुमच्या शरीराची कामगिरी सुधारेल, असे ते म्हणतात.
हेही वाचा: रात्री गरम पाणी पिण्याचे आहेत तीन फायदे! जाणून घ्या

weight loss
3) तुमचे वजन नियंत्रणात राहील- काही संशोधकांच्या मते, जास्त थंड पाणी पिण्यापेक्षा नॉर्मल पाणी पिणे जास्त चांगले आहे. कारण यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते. स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट नॅन्सी क्लार्क यांच्या मते थंड पाणी गरम पाण्यापेक्षा चांगले आहे. कारण ते तुमच्या शरीराला अधिक थंड करते. तसेच थंड पाणी शरीराचे तापमान लक्षणीयरित्या वाढण्यापासून रोखू शकते, असेही एका संशोधकाने सांगितले.
हेही वाचा: व्यायामामुळे सुधारते लैंगिक आरोग्य, अभ्यासात स्पष्ट
Web Title: Drinking Cold Or Hot Water After A Workout Know What Is The Truth
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..