Puran Poli health benefits in marathi
Puran Poli health benefits in marathi esakal
लाइफस्टाइल

Puran Poli : सणसमारंभात बनवली जाणारी पुरणपोळी खाण्याचे फायदे माहितीयेत का?

Pooja Karande-Kadam

Puran Poli :

हिंदू संस्कृतीत सण-समारंभ, यात्रा, उत्सव यांना महत्त्वाचे स्थान आहे. अशा सणांना महाराष्ट्रात देवी-देवतांना नैवेद्य दाखवला जातो. प्रत्येक सणाला पुरणाची पोळी बनवली जाते. गावची यात्रा असेल तरी ग्रामदैवताला पुरणाच्या पोळीचाच मान असतो. खीर-पुरीचा बेत फार कमी सणांना केला जातो.

नुकताच मार्गशीर्ष महिना संपला. मार्गशीर्षातील गुरूवारी देवीचे व्रत केले जाते. त्यावेळीही गृहिणी आवर्जून पुरणपोळीचा बेत आखतात. दोन दिवसांवर मकर संक्रांत आलीय. तर तेव्हाही अनेक घरात पुरणपोळी बनवली जाईल. प्रत्येक सणाला आपल्या घरात बनणाऱ्या मानाची पुरणपोळी खाण्याचे आपल्या आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.

पुरणपोळी हा आपला पारंपरीक पदार्थ आहे. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. तसेच, पुरणपोळीसोबत मिरचीचे लोणचेही चवीला खातात. कर्नाटकामध्ये पुरणपोळी बटाटा आणि वांगी या भाजीसोबतही खाल्ली जाते.

मराठीमध्ये पुरणपोळी म्हणून ओळखले जाते. तेलगू, आंध्र प्रदेश मध्ये याला बॉबबट्टू किंवा बक्सम किंवा ओलिगा म्हणून ओळखले जाते. कन्नड मध्ये याला होलिगे किंवा ओबाट्टू म्हणून ओळखले जाते. गुजराती मध्ये पुरण पुरी किंवा वेद्मी म्हणून ओळखले जाते. (Makar Sankranti )

पुरणपोळी खाण्याचे फायदे

पचनसंस्थेसाठी फायदेशीर

घरी बनवलेली पुरणाची पोळी खाण्याचा मोठा फायदा म्हणजे तुमच्या पचनसंस्थेत फरक पडतो. पोळीसाठी लागणारं पुरण हरभऱ्याच्या डाळीपासून बनवलं जातं. त्यामुळे केवळ तूर मूग याच डाळी खाणारे लोकांच्या पोटात हरभरा जातो. पोळी खाल्ल्याने अन्न पचन होण्यास मदत होते.     

गुळामध्ये लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे घटक असतात. साखरेपेक्षा गुळ पचायला थोडा वेळ लागत असल्याने उर्जा बराचकाळ पोटात साठून राहतो. त्यामुळे पचनसंस्था चांगली राहते.

वजन वाढत नाही

वजन वाढेल, जास्त कॅलरी पोटात जातील म्हणून काही लोक अनेक पदार्थांपासून दूर राहतात. यात पुरणपोळीचाही समावेश असतो. पण वजनाची काळजी असलेल्यांनी बिनधास्त पुरणपोळी खावी. कारण, हरभरा, गूळ अन् गहू यांसारख्या पोषक घटकांनीच पुरणपोळी बनते.

ऍनिमियापासून सुटका करते

सध्या फास्टफूड मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. फास्टफूड बनवण्यासाठी मैद्याचा वापर जास्त केला जातो. मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे ऍनिमिया होण्याचा धोका अधिक असतो. अशावेळी शुद्ध गव्हाच्या पिठापासून बनवलेली पुरणाची पोळी ऍनिमियापासून आपल्याला दूर ठेवते.

साथीच्या आजारापासून बचाव करते

पावसाळा हिवाळा यांसारख्या ऋतूमध्ये साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरतात. त्यामुळेच या दिवसात पुरणाची पोळी खाल्ल्याने शरीरात उब निर्माण होते, त्याचा आपल्या शरीराला फायादा होतो.  गव्हाच्या पिठात तयार केलेल्या पुरण पोळीमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, बी-कॉम्प्लेक्स, जीवनसत्त्वे आणि काही खनिजे मोठ्या प्रमाणात असतात.

त्याचा फायदा तुमच्या शरीराला होतो. तसेच कणीक आणि डाळ एकत्र केल्याने तुम्हाला प्रथिने मिळतात. तसेच अमिनो अॅसिड मिळत असल्याने शरीरास अधिक फायदा होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT