यंदा रक्षाबंधन नेमके कधी आहे?
यंदा रक्षाबंधन नेमके कधी आहे? सकाळ डिजिटल टीम
लाइफस्टाइल

Rakshabandhan 2022 : यंदा रक्षाबंधन नेमकं कधी आहे? 11 की 12 तारखेला?

सकाळ डिजिटल टीम

Rakshabandhan 2022 : यावर्षी रक्षाबंधन सणाबाबत लोकांच्या मनात एक संभ्रम निर्माण झाला आहे, तोच संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न आम्ही आज या बातमीतून करणार आहोत. या वर्षीची नारळीपौर्णिमा 11 आणि 12 या दोन दिवशी येत आहे. त्यामुळे रक्षाबंधन नेमक्या कोणत्या दिवशी साजरे करावे हेच बहिणींना कळत नाही आहे. रक्षाबंधन हा सण दरवर्षी शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. बहिण भावाच्या प्रेमाच्या नात्याचा पवित्र सण म्हणून रक्षाबंधन ओळखले जाते.

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाच्या मनगटावर संरक्षक धागा बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक मानला जातो. मात्र यावेळी बहुतेक जणांच्या मनात याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे, नेमके रक्षाबंधन कधी साजरे करायचे?

वास्तविक यावेळी पौर्णिमा तिथी (रक्षाबंधन 2022 तारीख) 11 आणि 12 या दोन दिवशी येत आहे. त्यामुळे कोणत्या दिवशी राखी बांधली जाईल हे लोकांना समजत नाही.

पंचांगानुसार, श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा 11 ऑगस्ट रोजी सकाळी 10.38 वाजता सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी 12 ऑगस्ट रोजी सकाळी 7.05 वाजता समाप्त होते. या अर्थ असा होतो की रक्षाबंधन 11 तारखेलाच साजरे केले जाणार आहे. कारण पौर्णिमा ही 11 तारखेला पूर्ण दिवस असणार आहे. त्यामुळे 11 ऑगस्टलाच तुम्ही तुमच्या लाडक्या भावाला राखी बांधावी.

2022 चे रक्षाबंधन कधी आहे ? या वर्षी रक्षाबंधन हे 11 ऑगस्ट 2022 गुरुवारी आहे. या वर्षी राखीपौर्णिमेची सुरुवात 11 ऑगस्टला सकाळी 10 वाजून 38 मिनिटांनी होते तर पौर्णिमा समाप्ती ही 12 ऑगस्टला सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी होणार आहे.

रक्षाबंधन साठी शुभ मुहूर्त कोणते आहे?

(Raksha Bandhan 2022 Date)

  • 11 ऑगस्टला शुभ मुहूर्त हा सकाळी 9 वाजून 28 मिनिटांपासुन ते रात्री 9.14 पर्यंत असणार आहे.

  • अभिजीत मुहूर्त हा दुपारी 12 वाजून 6 मिनिटांपासुन 12.57 मिनिटे असणार आहे.

  • अमृत काळ हा संध्याकाळी 6 वाजून 55 मिनिटांपासुन ते 8 वाजून 20 मिनिटापर्यंत असणार आहे.

  • ब्रह्म मुहूर्त - सकाळी 04 वाजून 29 मिनिटापासुन ते 5 वाजून 17 मिनिटापर्यंत असणार आहे.

रक्षा बंधन 2022 भद्रा काळ

(Raksha Bandhan 2022 Bharta kaal)

रक्षा बंधन २०२२ भद्रा काल रक्षाबंधनाच्या दिवशी भद्र कालावधीची समाप्ती ही रात्री 08 वाजून 51 वाजता होणार आहे.

रक्षाबंधनाच्या दिवशी, भद्रा कधी असेल?

11 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 05 वाजून 17 मिनिटांपासुन ते 06 वाजून 18 मिनिटापर्यंत असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंकडून INDIA आघाडीच्या पंतप्रधानांच्या शपथविधीचं मोदींना निमंत्रण; म्हणाले, खुर्चीवर आहे तोपर्यंत...

Virat Kohli : विराट कोहली बीसीसीआयवर झाला नाराज; हा नियम रद्द करण्याची केली मागणी

Viral Video: संसदेमध्ये असला राडा कधीच पाहिला नसेल! सभागृहात खासदारांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडिओ

Nashik Crime News : रेल्वे कर्मचाऱ्याकडूनच पानेवाडीत इंधनाची चोरी; 6 जण ताब्यात

Latest Marathi News Live Update : बिभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणाचा निर्णय कोर्टाने राखून ठेवला

SCROLL FOR NEXT